शिक्षकांनी गावातच राहावे! शिक्षणमंत्र्यांच्या 'या' मार्गदर्शक सूचना esakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षकांनी गावातच राहावे! शिक्षणमंत्र्यांच्या 'या' मार्गदर्शक सूचना

शिक्षकांनी गावातच राहावे! शिक्षणमंत्र्यांच्या 'या' मार्गदर्शक सूचना

तात्या लांडगे

राज्य सरकारने त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर करीतसोमवारी नवे आदेश काढले.

सोलापूर : राज्यातील पहिलीपासूनचे पुढील सर्व वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. राज्य सरकारने (Maharashtra State Government) त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर करीत आज (सोमवारी) नवे आदेश काढले. त्यानुसार मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांना वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. शिक्षकांनी शक्‍यतो त्याच गावात राहावे, लसीचे (Covid Vaccine) दोन्ही डोस घेतलेले असावेत, मुलांनी मास्कचा वापर करावा, विद्यार्थी संख्या अधिक असल्यास दोन सत्रात शाळा भरावावी, एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थी असावेत, दोन बाकातील अंतर सहा फूट असावे, एका बाकावर एकच विद्यार्थी असावा, अशा विविध सूचना शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) दिल्या आहेत. मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच पहिली ते चौथीच्या शाळा (School) सुरू होत असल्याने मुलांची संख्या लक्षणीय राहणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी त्या- त्या मुख्याध्यापकांवर असेल, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्याध्यापकांसाठी सूचना...

  • सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले हवेत

  • गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये

  • जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दोन सत्रात भरवाव्यात; एका बाकावर असेल एकच विद्यार्थी

  • दोन बाकांमध्ये असावे सहा फुटांचे अंतर; एका वर्गात 15 ते 20 विद्यार्थीच बसवावेत

  • मुलांना शाळेत टप्प्याटप्याने बोलवावे; एक दिवसाआड अथवा सकाळी-दुपारी

  • शाळांनी वाहतूक आराखडा तयार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी

शिक्षकांसाठी सूचना...

  • शिक्षकांनी शक्‍यतो त्या गावातच राहावे

  • सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर टाळावा

  • शाळेत सर्वांची हात धुण्याची व्यवस्था करावी

  • शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मागील 48 तासातील आरटीपीसीआर चाचणी करून त्याचे प्रमाणपत्र व्यवस्थापन समितीला द्यावे

  • दोन लसी घेतलेल्यांनाच शाळा अथवा कार्यालयात प्रवेश दिला जाईल

  • परिपाठ, स्नेहसंमेलन यासह गर्दीचे कार्यक्रम ऑनलाइनच घ्यावेत

  • आजारी मुलांना लगेचच जवळील रुग्णालयात दाखल करावे; शाळेत येण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती घ्यावी

विद्यार्थ्यांसाठी सूचना...

  • घरात जाताना थेट वॉशरूमकडे जावे

  • अंघोळ करून कपडे बदलावेत

  • अंघोळीनंतर कपडे साबणाने धुवावेत

  • मास्कसुद्धा साबणाने स्वच्छ धुवावा

  • पालकांनी मुलांचा मास्क, स्वच्छता, कपड्यांकडे कटाक्ष ठेवावा

पालकांसाठी सूचना...

  • मुलगा शाळेतून घरी आल्यावर व दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना त्याच्या आरोग्याची घ्यावी खबरदारी

  • कोविड आजारासंबंधीचे व नियमांचे पालन करण्यासंदर्भात पालकांनी मुलांना घरी मार्गदर्शन करावे

  • कोरोना होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करावा

  • पालकांनी मुलांना लागलेली मोबाईलची सवय मोडण्यासाठी प्रयत्न करावेत

  • मुलांना कमीत कमी पुस्तके, वह्या न्याव्या लागतील, याची काळजी घ्यावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT