gunaratna sadavarte allegation on sharad pawar over conspiracy to arrest bjp devendra fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'शरद पवार हेच मास्टरमाइंड'; फडणवीसांच्या त्या आरोपावर गुणरत्न सदावर्तेंचा दावा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकराच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता असा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून यानंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रचल्याचा दावा केला आहे.

सदावर्ते म्हणाले की, दिलीप वळसे पाटील यांच्या तोंडून काल कट असा एक शब्द निघाला. त्या शब्दाचा मतितार्थ लक्षात घ्या.एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला असं दर्शवून मला अटक करण्यात आली होती.

त्या अटकेनंतर एक श्रृंखला सुरू झाली. पोलिसांना माहिती होतं, विश्वास नांगरे पाटील यांना माहिती होतं की मी कोर्टात युक्तीवाद करत होतो. पण त्यांच्या डोक्यात वेगळंच शिजत होतं. ते माझ्या लक्षात अटकेनंतर आलं, असे सदावर्ते म्हणाले.

त्यांच्या डोक्यात जे शिजत होतं ते असं होतं की, निलोत्पालांची डीसीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या निलोत्पालांनी वारंवार मला रात्री लॉकअपमधून बाहेर आणलं जातं होतं. मला बसवलं जायचं आणि जी चर्चा केली जात होती, ती शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची कमी होती आणि नागपूर, आरएसएस, राईटविंग अॅक्टिव्हीस्ट आणि देवेंद्र फडणवीसांची भेट याच्यासंबंधी भेटी कधी झाल्या याचा तपास फिरवला जात होता.

मी त्यांना सांगत होतो, तुम्ही चुकीचा तपास करतं आहात. मात्र, कसंही करून त्यांना आम्हाला अडकवायचं होतो, असा आरोपही सदावर्ते यांनी केला.

हा कट कुठे रचला गेलाय दिलीप वळसे पाटील, अजित पवार विश्वास नांगरे पाटलांची नार्को टेस्ट करा. कट कुठे झाला ते तुम्हाला लक्षात येईल असेही सदावर्ते म्हणाले. मला अटक झाल्यानंतर काही नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली होती.

संजय पांडे उसुद्धा या बैठकीत उपस्थित होते. तिथेच हा कट रचण्यात आला. त्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांना अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला. त्यांना आरएसएस आणि देवेंद्र फडणवीस यांना फ्रेम करायचं होतं असेही सदावर्ते यावेळी म्हणाले.

आरोपी गुन्हेगार गुन्हा करतो. पण एकतरी पुरावा सोडून जातो. गावदेवी पोलीस ठाण्यातील एक हार्डीस्क आहे, ती एकदोन दिवसांची नाही, त्यात दोन वर्षांचं रेकॉर्डींग आहे. ती आणा, कोल्हापुरातील फुटेज आणा, कोल्हापूरचू फुटेज आणा त्यातून हा कट कशाप्रकारे रचण्यात आला होता, हे लक्षात येईल.

वळसे पाटलांच्या तोंडून खरा शब्द निघाला कट. याच्यामागे मास्टरमांईड शरद पवार आहेत, असा आरोपही त्यांनी केला.दिलीप वळसे पाटील अजित पवार हे शरद पवारांचे प्यादे असल्याचेही सदावर्ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT