Death threat to Gunaratna Sadavart  
महाराष्ट्र बातम्या

Gunaratna Sadavarte Death Threat : बिग बॉसच्या घरात जाण्याआधी गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी!

रोहित कणसे

प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी बिग बॉस या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये जाणार आहेत. याबद्दलची घोषणा सदावर्ते यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे. यादरम्यान गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सदावर्ते यांना इंटरनॅशनल कॉलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. निनावी क्रमांकावरून कॉल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

वरळी विधानसभेतून निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने तसेच जिजामाता नगर संदर्भात वक्तव्य केल्यामुळे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याठी रवाना झाल्या आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांना बिग बॉस हिंदीच्या सहभागाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, यावर उत्तर देताना सदावर्ते यांनी आगे आगे देखो होता हैं क्या.. मी कशाचीच काळजी करत नाही आणि कुणालाच घाबरत नाही. माझी लढाई ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आहे, असं उत्तर दिलं होतं.

बिग बॉसच्या घरामध्ये कुठलीही लढाई किंवा तंटे होणार नाहीत. कुठल्याही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत, हे मी सांगतो. चांगली माणसं ही चांगल्या माणसांना शोधत असतात, त्यामुळे बिग बॉसने मला शोधले आहे. घरातल्या इतर सदस्यांसोबत माझं भावाचं नातं राहणार आहे, असेही सदावर्ते म्हणाले होते.

दरम्यान गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉस हिंदीच्या घरातील १८ सदस्यांपैकी ते एक असणार आहेत. सदावर्ते घरामध्ये कसे वावरतात, इतर सदस्यांसोबत ते कसं जुळवून घेतात, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

Jammu Kashmir Exit Poll Result: हरियाणानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला धक्का; काय सांगतो एक्झिट पोलचा अंदाज? वाचा सविस्तर...

मेट्रोच्या Aarey To BKC Aqua Line भुयारी सेवेला आजपासून सुरूवात, कसं असेल भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या...

Haryana Exit Poll Result: 10 वर्षांचा दुष्काळ संपणार! हरियाणात काँग्रेसचं सरकार? पाहा एक्झिट पोलचा अंदाज...

Sports Bulletin 5th Oct 2024 : मुंबईने २७ वर्षांनी जिंकला इराणी चषक ते भारतीय महिला संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलचे समीकरण, एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT