लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाकडून शिवाजी पार्क येथे हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.या मोर्चामध्ये भाजप तसेच शिंदे गटाचे नेते सहभागी झाले होत. दरम्यान या मोर्चामध्ये बोलताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. ते ते ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
सदावर्ते म्हणाले की, पाकिस्तान्यांच्या नीच विचारांमधून लव्ह जिहाद चालू झाला. या लव्ह जिहादला दफन करण्यासाठी मुंबईत हिंदू समाज एकवटला आहे. सरकारला साकडं घलतं आहे लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा अशी आम्ही मागणी करतो. दाऊद इब्राहीमचा, बाबरचा विचार दफन करा. संत म्हणून आले आणि धर्मप्रचार करायला लागले आहेत, हे सगळं लक्षात घेऊन आज हिंदू एकवटला आहे, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
अन् सदावर्तेंची जीभ घसरली...
दरम्यान पुढे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना सदावर्ते यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, शरद पवार यांच्या तोंडाला आजार झालेला आहे. त्यांना दुसऱ्या विषयावर बोलायला सुचते. मग लव्ह जिहादच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत. हैदाबादचा मियाँभाई लव्ह जिहादवर का बोलत नाही, असेही ते म्हणाले. या सर्वांनाच प्रश्न विचारण्यासाठी, त्यांना उघडे पाडण्यासाठी तसेच लव्ह जिहादला ठोकरून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
मुंबईत आज हिंदुत्ववादी संघटनांकडून हिंदु जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला हिंदू बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तर भाजपचे मुंबईतील आघाडी नेते आणि शिंदे गटाचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले. मात्र उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मोर्चापासून अंतर ठेवलं आहे.
भाजपनेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, आशिष शेलार, केशव उपाध्ये, नितेश राणे आणि चित्रा वाघ या मोर्चात सहभागी झाले आहेत. मात्र या मोर्चात ठाकरे गटाचे नेते दिसले नाहीत. त्याचवेळी भाजपनेते आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते देखील मोर्चात दिसले नाहीत. दरम्यान हा मोर्चा केवळ भाजपचाच होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.