Tanaji Sawant Sakal
महाराष्ट्र बातम्या

H3N2 Deaths : ताप अंगावर काढू नका; राज्यात २ मृत्यू झाल्यावर आरोग्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना

H3N2 ने लगेच मृत्यू होत नाही, असंही आरोग्यमंत्री सावंत म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातला कोरोनाचा प्रभाव ओसरताच आता H3N2 ची नवी भीती निर्माण झाली आहे. यामुळे सध्या राज्यामध्ये २ मृत्यू झाले आहेत. त्याबद्दल बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.

आरोग्यमंत्री सावंत यांनी नागरिकांना ताप अंगावर न काढण्याची सूचना दिली आहे. तसंच राज्यातल्या रुग्णांच्या स्थितीबद्दल माहिती दिली आहे. सावंत म्हणाले, "१२ मार्चला राज्यात ३५२ रुग्ण आहेत. परीक्षा संपल्यावर मित्रांसोबत फिरायला आलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केलेलं, रात्री १२ वाजता त्याचा मृत्यू झाला. नागपूरमधल्या एका इसमाचाही मृत्यू झाला आहे.H3N2 ने लगेच मृत्यू होत नाही, उपचार घेतला तर तो रुग्ण बरा होतो."

राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे हे सांगताना तानाजी सावंत म्हणाले, "सर्व रुग्णालयांमध्ये आम्ही याबद्दल अलर्ट दिला आहे. अशा आजाराचा रुग्ण असेल तर त्याच्यावर उपचार करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नागरिकांना सूचना आहे, जर ताप आला असेल, तर अंगावर काढू नका. तात्काळ डॉक्टरचा सल्ला घ्या."

या व्हायरसची लक्षणे काय आहेत?

  • खोकला

  • अस्वस्थ वाटणं

  • उलट्या होणं

  • घशात खवखव

  • अंगदुखी

  • बद्धकोष्ठता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT