भगवान हनुमानाचे जन्मस्थान देशात कुठे आहे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. वाल्मीकी रामायणाचा आधार घेत शंकराचार्यांच्या उपस्थितीत किष्किंधा पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा कर्नाटकमधील किष्किंधा हनुमान जन्मस्थळ ट्रस्टचे स्वामी गोविंदानंद सरस्वती ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या तीर्थक्षेत्री त्र्यंबकेश्वरमध्ये केला आहे.
भगवान हनुमानाचे जन्मस्थान देशात कुठे आहे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. देशात तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातोय. हनुमानाच्या जन्मस्थळावरून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये वाद निर्माण झाला आहे.वाल्मीकी रामायणाचा आधार घेत शंकराचार्यांच्या उपस्थितीत किष्किंधा पर्वत हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा कर्नाटकमधील किष्किंधा हनुमान जन्मस्थळ ट्रस्टचे स्वामी गोविंदानंद सरस्वती ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेल्या तीर्थक्षेत्री त्र्यंबकेश्वरमध्ये केला आहे.हनुमान जन्मस्थळाबाबत अनेक जुने पुरावे आणि संदर्भ सादर केले जात आहे. वाल्मिकी रामायणाचेही संदर्भ दिले जात आहेत, यानुसार अंजनेरी हनुमानाची जन्मभूमी असल्याचे समोर येत असले तरी किष्किंधा हिच हनुमानाची जन्मभूमी असल्याचे किष्किंधाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वती महाराजांनी सांगितले आहे. यासाठी नाशिक येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
आता नेमका हनुमानाचा जन्म कुठे झाला यावरुन वाद आणखी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी केलेल्या दाव्यामुळे हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या अंजनेरीमधील ग्रामस्थ, आखाडा परिषद आणि तमाम ब्रह्मवृंद संतप्त झाले आहेत.
स्वामी गोविंदानंद यांच्या दाव्यानंतर अंजनेरी येथील अंजनीमाता आणि बालहनुमान मंदिरात महंत अशोकबाबा, बेझे येथील श्रीराम शक्तिपीठ संस्थानचे पीठाधीश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक झाली. जनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्यासंबंधी स्कंद, ब्रह्म, विष्णुपुराण, नवनाथसार, त्र्यंबकमाहात्म्य, संत एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण याचा दाखला देण्यात आला आहे. स्वामी गोविंदानंदांच्या दाव्याला धार्मिक पुराव्याच्या आधारे उत्तर दिले जाईल आणि प्रसंगी याप्रश्नी न्यायालयात जाऊन दाद मागण्यात येईल, असा निर्धार साधु-महंत आणि तमाम नागरिकांनी केला आहे. या वादादरम्यान हनुमानाचे जन्मस्थान किष्किंधा आहे की अंजनेरी यासंदर्भात विद्वानांनी लेखी पुरावे मांडावे असं त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी आवाहन केले आहे. esakalesakalअंजनेरी येथील अंजनी माता आणि बाल हनुमान मंदिर.अंजनेरी येथील अंजनी माता आणि बाल हनुमानची मूर्ती.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.