जेष्ठ विचारवंत आणि संशोधक हरी नरके यांनी ट्वीट करत एक फोटो शेअर केला आहे. क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले एक पोस्टर त्यांनी आपल्या ट्वीटरवर पोस्ट केले आहे. ब्राम्हण प्रीमियर लीग असं या स्पर्धेचं नाव असून त्यावर हरी नरके यांनी जाती बघून खेळाडू निवडावेत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
ब्राम्हण प्रीमियर लीग नावाचं पोस्टर त्यांनी आपल्या ट्वीटरवर शेअर करत आपली खंत व्यक्त केली आहे. या स्पर्धेच्या पोस्टरवरून ही स्पर्धा संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली असल्याचं समजतंय. ब्रम्हनाद ढोल पथक, संभाजीनगर आणि ब्राम्हण प्रीमियर लीग समिती हे या स्पर्धेचे आयोजक आहेत. २०२२ वर्षाची ही स्पर्धा असून त्यावर त्याचा उल्लेख आहे.
ते म्हणाले की, आपण सगळे भावंड आहोत याचा विसर पडू देऊ नये. या पोस्टवर शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर यांची छायाचित्रे आहेत. मग संयोजकाचा हेतू संकुचित वाटतो की योग्य वाटतो? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एका पोस्टरवर एका जातीच्या नावाने स्पर्धा भरवल्याचं दिसतंय. त्यातले संघ हे एका विशिष्ट जातीच्या अभिमानाने मिरवले जातात असं ते म्हणाले. दरम्यान मराठा चषक या स्पर्धेचे पोस्टर साम टीव्हीच्या वृत्तात दाखवण्यात आलं आहे.
तसेच ब्राम्हण प्रीमियर लीग हे पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलंय की, मैदानात जातीची प्रमाणपत्रे सोबत आणावीत, इतर जातीचे खेळाडू आढळले तर संघ बाद केला जाईल अशा अटी असाव्यात का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच तुम्हाला काय वाटते? असा प्रतिप्रश्नही केला आहे. सभ्य, संयमित आणि समंजस भाषेत व्यक्त व्हावे. कोणत्याही समाजाबद्दल कटुता अथवा द्वेषभावना वाढेल असे लेखन कृपया टाळावे. आपल्याला गोळ्यामेळ्याने राहायचे आहे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान मराठा चषकाचेही फोटो सध्या व्हायरल होत असून खेळामध्ये जात घुसली आहे का? अशा आशयाची बातमी साम टीव्हीने दाखवली आहे. त्यामुळे खेळंही आता जातीजातीच्या ग्रुपने खेळले जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.