वारणानगर (कोल्हापूर) : आम्ही अदानी-अंबानी (Adani Ambani)नसून जनतेचे सेवेकरी आहोत, याची दखल शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांनी घ्यावी. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होत असताना केवळ शिवसेनेच्या अट्टहासापायी निवडणूक लादल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ (Hasan MUshrif) यांनी केला. दरम्यान आमदार विनय कोरे (Vinaya Kore) यांनी पन्हाळा (Panhala) तालुक्यातील २४४ पैकी २३२ ठरावधारक मेळाव्याला उपस्थित असल्याने विजय निश्चित असल्याचा दावा केला. जिल्हा बँकेच्या छत्रपती शेतकरी विकास आघाडीच्या पन्हाळा तालुक्यातील मतदारांचा मेळावा आज विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक केंद्रात झाला. त्यावेळी ते बोलत होते. (KDCC Bank Election)
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होत असताना केवळ शिवसेनेच्या अट्टहासापायी निवडणूक लादल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, माजी खासदार निवेदिता माने, गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, सभापती वैशाली पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेने अडचणीतून मार्ग काढत १० हजार कोटी ठेवींकडे वाटचाल सुरू केली आहे. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कर्ज देण्यासाठी प्रयत्न राहील. तरुणांना उद्योगधंद्यासाठी विविध योजना राबविणार आहे. आमदार विनय कोरे यांनी सूचविलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहील.’’
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘बँक राजकारणविरहीत असावी यासाठी कायम प्रयत्न आहे. जिल्हा बँकेत शेतकऱ्यांचा घामाचा पैसा असून ही बँक टिकविण्यासठी मुश्रीफांसह विश्वस्तांनी चांगले प्रयत्न केले.’’
आमदार कोरे म्हणाले, ‘‘बिनविरोध होण्यापेक्षा मी लोकशाही मार्गाने विजय होण्यात मला आनंद आहे. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांचे मंदिर आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्यानंतरही निवडणूक प्रक्रियेपोटी ३० हजार घेतले जातात ही रक्कम संस्थेच्या दृष्टीने मोठी असते ती रक्कम घेऊ नये यासाठी मुश्रीफ व सतेज पाटील यांनी प्रयत्न करावेत. बँकेने स्वतःची विमा कंपनी स्थापून शेतकऱ्यांना कमी मोबदल्यात अधिक लाभ व्हावा. हॉलंडमधील रॅबो बँकेच्या धर्तीवर जिल्हा बॅंकेचा विस्तार करावा.’’
आमदार पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांचीही भाषणे झाली. ‘गोकुळ’चे संचालक अमरसिंह पाटील यांनी स्वागत केले. छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार, सभापती, ठरावधारक उपस्थित होते. ॲड. शाहू काटकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.