Hasan Mushrif on Rohit Pawar: अजित पवार गटात असलेले राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार गटात असलेले राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे, असे हसन मुश्रीफ म्हणाले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. हसन मुश्रीफ मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
रोहित पवार ‘साहेबांचा संदेश’ या कार्यक्रमाअंतर्गत राज्यव्यापी दौरा करत आहेत. आज ते कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 1998 मध्ये हसन मुश्रीफ यांना संधी देवू नये, असा अनेक नेत्यांचा आग्रह होता. पण शरद पवार यांनी हा विरोध डावलून हसन मुश्रीफ यांना संधी दिली. पण आता एमआयडीसीमध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत. असे रोहित पवार म्हणाले.
यावर हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. रोहित पवार नवखे आहेत. त्यांना तिकडे अजित पवारांची जागा घ्यायची आहे. ते कशासाठी एवढे धाडस करत आहेत. कोल्हापुरात सहा आमदार होते आता कमी झाले. पुण्यात देखील अशी परिस्थीती झाली आहे. आरोप करायला जागा नसल्याने ते असे बारके आरोप करतात. मला १९९८ मध्ये कुणाचा विरोध होता हे जाहीरपणे सांगावे. मंडलीक साहेब तर माझ्याच सोबत होते, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
शरद पवार यांची उद्या कोल्हापुरात दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे, यावर हसन मुश्रीफ म्हणाले, पवार साहेबांना एवढ्या छोट्या मैदानात आणायला नको होते. त्या मैदानात पाच हजार लोक बसू शकतील. त्यांच्या सभेला गर्दी व्हावी याच आमच्या शुभेच्छा आहेत.
शरद पवार यांनी अजित पवार गटाला त्यांना फोटो वापरला तर कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता. यावर देखील हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, पहिल्यांदा कुणीही कोर्टात जाणार नाही हे ठरले होते. मात्र फोटोवरून पवार साहेब कोर्टात जाणार असेल तर काय करणार?. पाच जुलैचे अजितदादांचे भाषण नीट ऐका त्यांनी स्पष्ट केले आहे की आम्हा एकच पक्ष आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.