सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही राज्यातल्या हिंदू संघटनांकडून होणाऱ्या, भावना भडकवणाऱ्या भाषणांवर राज्य सरकार नियंत्रण ठेवू शकलं नाही. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याने सरकारविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची टिप्पणी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अशातच, जेष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केलीय. (Kapil Sibal tweet after Supreme Court decision )
राज्य सरकारविरोधात दाखल केलेल्या याचिकवर निर्णय देताना ज्यावेळी राजकारण आणि धर्म वेगळे होतील, तेव्हा हे सगळं थांबेल. राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करायला हवं, असं न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी सुनावलं.
हाच धागा पकडत कपिल सिब्बल यांनी खोचक ट्विट केलं आहे. 'चंद्र मागताय पण, लक्षात ठेवा अडवाणीजींची रथयात्रा, आरएसएस प्रमुखांच्या "शमशान-कबरीस्तान टिप्पण्या (2018), गोली मारो सालों…(२०२०) भाषण इत्यादी...
काही राजकारण द्वेषावर आधारित आहे. असही सिब्बल ट्विटमध्ये म्हणाले.
कोर्टाचा निर्णय नेमका काय ?
धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. मुंबईतल्या हिंदू जन आक्रोश रॅलीविरोधातली एक सुनावणी काल पार पडली. यावेळी न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकार षंढ आहे, ते काहीच करत नाही, त्यामुळंच हे सगळं काही होत आहे, अशा भाषेत सुनावलं आहे.
ज्यावेळी राजकारण आणि धर्म वेगळे होतील, तेव्हा हे सगळं थांबेल. राजकारण्यांनी धर्म आणि राजकारण वेगळं करायला हवं, असंही न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.