minister dr. tanaji sawant sakal
महाराष्ट्र बातम्या

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्याचे ‘आरोग्य’ ८८० कर्मचाऱ्यांवर! आरोग्य सेविका-सेवकांची ४९५ पदे रिक्त; औषधे देण्यासाठीही अधिकारी कमीच

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील आरोग्य विभाग केवळ ८८० पदांवर सुरू असल्याची धक्कादायक स्थिती आहे. जिल्ह्यातील ७७ आरोग्य केंद्रे व ४३१ उपकेंद्रांसाठी १४३१ पदे मंजूर आहेत. पण, त्यातील तब्बल ५५१ पदे रिक्त असून आरोग्यसेविका व सेवकांची ४९५ पदे रिक्त आहेत. औषध वितरित करणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्यांची २० पदे काही वर्षांपासून भरलीच नाहीत. ही वस्तुस्थिती खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्याच जिल्ह्यातील आहे.

ग्रामीण आरोग्य यंत्रणा सांभाळणारा पहिला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्यसेविका व सेवक आहे. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये सद्य:स्थितीत तब्बल ४९५ पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका आरोग्य सेविकेकडे दोन-तीन आरोग्य उपकेंद्रांची जबाबदारी असल्याची वस्तुस्थिती आहे. गरोदर मातांचा सर्व्हे, लसीकरणावेळी सर्व्हे, साथरोग नियंत्रण सर्व्हे अशी कामे देखील त्यांना करावी लागतात.

रिक्त पदांमुळे कामात पारदर्शकता राहत नाही. अनेक आरोग्य उपकेंद्रांना रिक्त पदांमुळे टाळे लावण्यात आलेले आहे. केवळ लसीकरणावेळीच ती उपकेंद्रे उघडी असतात, असे चित्र आहे. औषध निर्माण अधिकाऱ्यांची जबाबदारी मोठी असते, पण ही पदे देखील रिक्त आहेत. दुसरीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांची १६१ पदे मंजूर आहेत, पण अनेक महिन्यांपासून १२ पदे रिक्त आहेत. वाढलेल्या रिक्त पदांमुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांचेच आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.

शासनाकडून लवकरच होईल भरती

शासनाने कर्मचारी भरतीची जाहिरात काढली असून त्यानुसार पदभरती होईल. सध्या सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य विभागाच्या ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये ५३१ पदे रिक्त आहेत.

- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

रिक्त पदांची सद्य:स्थिती...

संवर्ग मंजूर पदे रिक्त पदे

औषध निर्माण अधिकारी ८० २०

आरोग्य सेविका ६९२ ३३५

आरोग्य सेवक ४३६ १६०

आरोग्य सहाय्यक २०१ ३६

आरोग्य पर्यवेक्षक १० २

एकूण १४१९ ५५३

दरवर्षी २५ लाख रुग्णांना सरकारी दवाखान्यांचा आधार

सोलापूरच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या जवळपास ३६ लाखांपर्यंत आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दरवर्षी सुमारे २५ लाख रूग्ण वेगवेगळ्या आजारांवरील किमान प्राथमिक स्वरूपाचे उपचार तरी घेतात. रुग्णांसाठी आधार असलेली ही ग्रामीण आरोग्य यंत्रणा रिक्त पदांमुळे कोलमडली आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागासाठी १४३१ मंजूर पदे असतानाही त्यापैकी केवळ ८८० पदे भरली आहेत. उर्वरित पदे अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने सर्वसामान्य रुग्णांवर पदरमोड करण्याची वेळ येत असल्याची वस्तुस्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत सिडकोच्या 26 हजार घरांची 'या' तारखेला निघणार लॉटरी; बोर्ड मिटींगमध्ये ठरला मुहूर्त

Pune Viral Video: कारची काच खाली करायला सांगितलं.. लाथा घातल्या; ऑटोरिक्षा चालकाच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

Laxman Hake : हाके यांच्यावरील गैरप्रकाराचा निषेध दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Laxman Hake : लक्ष्मण हाके यांनी मद्य प्राशन केले नाही; वैद्यकीय चाचणी अहवालातून स्पष्ट

SCROLL FOR NEXT