Maharashtra Rain Update  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Alert: राज्यात आज 'या' जिल्ह्यात बरसणार परतीचा पाऊस! हवामान विभागाचा इशारा

रोहित कणसे

Maharashtra Weather Updates in Marathi: देशात परतीच्या पावसाला सुरूवात झाली असून सध्या राज्यात देखील या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. हवामान विभागाकडून आज सोमवारी (ता. ७) महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून अधून मधून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात बाप्पयुक्त वारे तयारी झाले आहेत. हळुहळू या वाऱ्यांची घुसळण होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस शक्यतो सायंकाळी किंवा रात्री पडण्याचा अंदाज आहे.

राज्यात कुठे पाऊस होणार?

मुंबई ठाण्यासह महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांसह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अल निनोचा प्रभाव संपल्यानंतर भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार, सप्टेंबर महिन्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र, त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Latest Maharashtra News Updates : इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी! जयंत पाटलांनी केली घोषणा

Stock Market Crash: पंतप्रधान मोदींनी ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा दिला होता सल्ला तेच शेअर्स कोसळले

मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच गाड्या वेगळ्या नावाने का विकतात? या सणासुदीला नवीन कार घेण्याआधी ही बातमी नक्की वाचा..

Senior Citizens Care Tips: साठ वर्षानंतर 'या' टेस्ट करूनच घ्या, वाढत्या वयात आजारांपासून होईल बचाव

SCROLL FOR NEXT