Maharashtra rain Forecast esakal
महाराष्ट्र बातम्या

पुणे, नाशिकसह 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा तडाखा, गारपीटीचा अंदाज

सकाळ डिजिटल टीम

पुणे : धुळे, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून, तुरळक ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. बुधवार (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather Update)

पुण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता

पुणे शहर आणि परिसरात ही पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या शहर व परिसरात ढगाळ वातावरणाचे सावट कायम असून किमान तापमानात झपाट्याने वाढ तर कमाल तापमानात काहीशी घट झाली आहे. मंगळवारी शहरात १८.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तर ३४.३ कमाल तापमानाची नोंद झाली.

शहरात मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. गेल्या तीन ते चार दिवसांपासून दिवसभर ऊन सावलीचा खेळ कायम आहे. तर हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनूसार पुढील चार दिवस शहर आणि परिसरात ही स्थिती अशीच कायम राहणार असून मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर अंशतः ढगाळ वातावरण आणि त्यामुळे किमान तापमानात होणारी वाढ यामुळे पुणेकरांना उकाडा देखील अधिक जाणवणार आहे. किमान तापमान हे २० ते २४ अंशांवर पोहचू शकते.

जळगाव/नाशिक/नंदुरबार

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला. त्यामुळे, पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात गहू, हरभरा, मका पिकांचे सुमारे साडेपाच हजार हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

आठ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

जळगाव : शहरासह जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाटामुळे जिल्ह्यात गहु, हरभरा, मका पिकांचे सुमारे साडेपाच हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तसा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. अनेक शेतकऱ्यांचा गहु कापणीस आला होता.

यामुळे काही शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. २१४ गावातील ८ हजारांवरील शेतकऱ्याचे नुकसान शहरासह जिल्ह्यात काल (ता.७) रात्रीपासून अवकाळी पाऊस सुरू झाला. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. रब्बी हंगामातील पीक तोंडावर आलेले असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

चोपडा, धरणगाव, अमळनेर या तालुक्यात बाजरी, हरभरा, ज्वारी, गहु, मका, कांदा, भाजीपाला व इतर पिकांचे सुमारे पाच हजार ५९४ हेक्टरवर नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्यातील २७ गावातील ३५५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात बाजरी ४.५० हेक्टर, हरभरा २६, ज्वारी २९ तर गहु १९.३० हेक्टरवर नुकसान झाले आहे. धरणगाव तालुक्यात ७३ गावातील एक हजार ७४५ शेतकऱ्यांचे हरभरा ३०३ हेक्टर, ज्वारी २९१, गहु ३३३, मका ३६४, भाजीपाल्याचे १० हेक्टरवर नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यातील ११४ गावातील सहा हजार २१ शेतकऱ्यांचे हरभरा पिकांचे ३१५ हेक्टर, ज्वारी ६५०, गहू एक हजार १७०, मका एक हजार ८६०, कांदा १८०, भाजीपाला पिकांचे ४० हेक्टर नुकसान झाले आहे.

सर्वाधिक फटका मका पिकाला बसला आहे. एकूण दोन हजार २२४ हेक्टरवरील मका भुईसपाट झाला आहे. त्या खालोखाल गहुचे १५२२ हेक्टरवर नुकसान झाले. रावेर व सावदा परिसरातही गहू व केळीचे नुकसान झाले आहे. आज सकाळी सर्वत्र जोरात पाऊस होता. सकाळी अकरानंतर उघडीप मिळाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती.

पावसासह गारपिटीचा इशारा

केळी, गहू, हरभऱ्याचे नुकसान

वडाळी (जि. नंदुरबार) ः वडाळीसह परिसरातील जयनगर, कोंढावळ, खापरखेडा, बोराळे, कुकावल येथे वादळी वारा, गारपीटसह पाऊस झाला. त्यामुळे या गावांमधील काढणीवर आलेले केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

''जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, धरणगाव तालुक्यात सुमारे साडेपाच हेक्टरवर नुकसान अवकाळी पावसाने झाले आहे. मका, गहुचे सर्वाधिक नुकसान आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT