Maharashtra Rain Updates  eSakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : येत्या ४ दिवसात पावसाचा जोर वाढणार! 'येथे' बरसणार जोरदार पाऊस

रोहित कणसे

राज्यातील अनेक जिल्ह्यात अद्याप शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. यादरम्यान हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यासाठी महत्वाचे असणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या चार दिवसात राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. पुणे शहर आणि परिसरात काही ठिकाणी आज जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

येत्या 4 दिवसात १६-१९ जुलै दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस, होण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात पूर्णपणे मान्सून सक्रिय झाला असला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अद्यापही पुरेशा पावसाची प्रतिक्षा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात ठिकाणी खरीप हंगामाच्या पेरण्या रडखडल्या असून बळीराजा संकटात सापडला आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट देखील कोसळण्याची शक्यता आहे. मात्र येत्या चार दिवसात या भागात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT