महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Alert : मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढील काही तास धोक्याचे; 'या' भागात दरडी कोसळण्याची शक्यता, IMD कडून हायअलर्ट

Maharashtra Rain Alert : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर अनेक लोकल रेल्वे गाड्यांवर देखील पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं त्याचबरोबर काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

त्याचबरोबर 'सतर्क'ने दिलेल्या माहितीनुसार 'गेल्या ७२ तासांत दरड प्रवण क्षेत्रांत झालेला पाऊस लक्षात घेता कोकण आणि घाट क्षेत्रांत पुढील ४८ तासांत दरडींची 'सर्वसाधारण' शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास शक्यता आणखी वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. 'सतर्क'ने दिलेल्या माहितीनुसार काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर ज्या भागात दरडी कोसळण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी काळजी घ्यावी त्याचबरोबर शक्य असल्यास त्या ठिकाणी प्रवास करणे टाळावे असंही त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात कुठे कुठे कोसळणार पाऊस?

मुंबई पुण्यासह, ठाणे, पालघर, रत्नागिरी तसेच कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता

पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे, गोवा

संभाव्य घटनाः

डोंगरावरून दगड, माती घसरून येणे, झाडे पडणे, भिंत पडणे, जुन्या इमारती, वाडे यांचे भाग पडणे, सीमा भिंत कोसळणे, रस्ते, जमीन खचणे, फ्लॅश फ्लड, पाणी साचणे, वाहतूक कोंडी

दरड प्रवण क्षेत्रेः

रायगड- माथेरान, जुम्मापट्टी, सुकेळी, रायगड, मोरबे, दासगाव, चिंचाळी, केळवट, पोलादपूर, वाझरवाडी, चोलाई, श्रीवर्धन रत्नागिरी- कशेडी, कुडपण, तुळशी, सारंग, दापोली, भोस्ते, रघुवीर, शिंदी, दाभोळ, गुहागर, गोवळकोट, संगमेश्वर, चिपळण, चिंचघरी, कुंभार्ली, वेळणेश्वर, कुंभारखणी, मांजरे, कोंड्ये, कुरधुंडा, कोळंबे, पांगरी • मुंबई, ठाणे विक्रोळी, कळवा, अँटॉप हिल, घाटकोपर (प), कल्याण (पु), नालासोपारा, भांडुप, विरार, गिल्बर्ट हिल, चेंबूर, पांजरपोळ सिंधुदुर्ग आंबोली, भुईबावडा • सातारा- आंबेनळी, चिरेखिंड, कुडपण, महाबळेश्वर, तापोळा रस्ता, सह्याद्रीनगर, मेढ़ा, मेढ़ा, मार्ली, पसरणी, रुईघर, मांढरदेवी, शिरगाव, अंधारी, कोळघर, येवतेश्वर, रेवांडे, पोगरवाडी • कोल्हापूर - गगनबावडा, आंबा, अणुस्कुरा पुणे वरंधा, माळशेज, कार्ला, खंडाळा, दुधिवरे, उर्स, ताम्हिणी, लवासा, दासवे, सिंहगड, कडवे, घिवशी, पाबे, घोळ

विशेष खबरदारी:

घाट रस्त्यांवरून प्रवास करताना वाहन चालकांनी विशेष काळजी घ्यावी. पावसाचा जोर ओसरेपर्यंत घाट क्षेत्रातील पर्यटन स्थळे, गड, किल्ले, धबधबे आदी ठिकाणी जाणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT