Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला आज रेड अलर्ट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राज्यात आजपासून पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची हवामान विभागाची माहिती

अंकिता खाणे (Ankita Khane)

कोकणासह पश्चिम-मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असुन गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान मुंबईसह ठाणे उपनगर परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. मोठ्या पावसामुळे काही सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. तर पुणे शहर परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

पुण्यातील धरण परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यामध्ये चांगली वाढ होत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सुरू करण्यात असून मागील तीन ते चार दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. सध्या चारीही धारणांमध्ये मिळून साडेअठरा टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने तिथल्या शाळांना अतिवृष्टी आणि पूसस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. तर काही मदत संपर्क नंबर प्रासरित करून मदत मागण्यासाठी तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र 25 जुलै रोजी तयार झाले असून पुढच्या 48 तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे 48 तास हवामानात वेगाने बदल होऊ शकतात तर राज्याच्या अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT