नाशिक : राज्यात महिला आणि बालकांच्या लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, तसेच पीडितांपर्यंत पोलिसांना तत्काळ पोचता यावे यासाठी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेतून राज्यभरासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली आहे. त्यामुळे पीडितांना थेट संपर्क साधता येणार आहे. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. राज्यात महिलांवरील अत्याचार, अल्पवयीन मुली व महिलांचे लैंगिक अत्याचाराच्या घडतात. ()
अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या संकल्पनेतून स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, मुंबई याठिकाणी थेट संपर्क साधता येणार आहे. शहर पोलिस आयुक्तालयातर्फेही यासंदर्भात शहरातील शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक संस्था, खासगी आस्थापना तसेच, शहरवासीयांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधून घटना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेल्पलाइन क्रमांक
८९७६००४१११,
८८५०२००६००,
०२२-४५१६१६३५ (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.