Hingoli Yellow Rain: हिंगोलीमध्ये पिवळा पाऊस पडल्याची एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. यामुळं परिसरात भलतीच चर्चा रंगली होती. स्थानिकांनी या प्रकाराची माहिती प्रशासनाला कळवली, त्यानंतर प्रशासनानं याचा अभ्यास सुरु केला आहे.
नेमकं काय घडलं?
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावच्या शिवारात अचानक आकाशातून पिवळ्या रंगाचे थेंब कोसळत असल्याचं चित्र होतं. मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे पिवळ्या रंगाचं पाणी आणि थेंब कोसळत असल्यानं भलत्याच चर्चांना उधाणही आलं. ग्रामस्थांनी याची माहिती प्रशासनाला दिली, याची गंभीर दखल घेत प्रशासनानं याचा अभ्यास करत असल्याचं सांगितलं.
दरम्यान, हा पिवळा पाऊस म्हणजे केमिकलयुक्त पाऊस असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. कारण अशा प्रकारचा पिवळा आणि काळ्या रंगाचे पावसाचे थेंब आकाशातून पडत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.
रंगीत पावसाचे थेंब हे प्रदुषणामुळं तयार होतात. विशिष्ट प्रदुषित हवेशी ढगांमधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याशी संपर्क झाल्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि आपल्याला अशा प्रकारे विविध रंगांमध्ये पावसाचे थेंब पडत असल्याचा भास होतो. पण प्रशासनानं हिंगोलीतील या प्रकाराचा सखोल अभ्यास केल्यानंतरच नेमका हा प्रकार काय आहे? हे स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.