Hockey Player esakal
महाराष्ट्र बातम्या

Hockey Player : मेजर ध्यानचंदचे शिष्य काढतायेत झोपडीत आयुष्य! एकेकाळी केलेला हॉलंडचा पराभव

आपल्या देशाचा मान वाढावा यासाठी खेळाडू अहोरात्र मेहनत घेत असतात

सकाळ डिजिटल टीम

Hockey Player : आपल्या देशाचा मान वाढावा यासाठी खेळाडू अहोरात्र मेहनत घेत असतात, त्यांचं पूर्ण लक्ष त्यांच्या खेळावर असतं. तरीही यात आपल्याला यश मिळेलच आणि आपण भारतासाठी खेळू शकूच असं काही नाही. खेळाडू जीवाचं रान करतात आणि देशासाठी खेळतात पण यानंतर जर तो खेळडू आपल्या खेळात स्वतःचं नाव कमवू शकला नाही तर त्याची कारकीर्द पूर्णपणे संपुष्टात येण्याची शक्यता असते, यानंतर अशा खेळाडूंच हाड कुत्रही खाणार नाही इतकी सुद्धा वाईट अवस्था त्यांची होऊ शकते. याचं उदाहरण म्हणजे टेकचंद यादव.

एकेकाळी हॉकी स्टिकची दहशत होती

टेकचंद यादव (82) हे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील कॅंट भागात एका पडक्या झोपडीत राहताय. आश्चर्य म्हणजे हे एक आंतरराष्ट्रीय हॉकीपटू होते आणि मेजर ध्यानचंद यांचे शिष्य तर हॉकीपटू आणि रेफ्री मोहर सिंग यांचे गुरू आहेत. 1961 मध्ये ज्या भारतीय संघाने हॉकी सामन्यात हॉलंडचा पराभव केला होता, टेकचंद हे त्या संघाचे महत्त्वाचे खेळाडू होते.

नक्की कोण आहेत टेकचंद यादव?

टेकचंद यांचा जन्म 9 डिसेंबर 1940 रोजी कॅंट परिसरात झाला. त्यांचे वडील दुधाचा व्यवसाय करायचे. टेकचंद शाळेत शिकत असतानात्यांनी इतर मुलांना हॉकी खेळतांना इतर मुलांना बघितलं होतं आणि त्यांना हॉकी खेळण्याची प्रेरणा मिळाली.

त्यांनी आपली पहिली हॉकी ही झाडांच्या फांद्या तोडून बनवलेली आणि मित्रांसोबत हा खेळ खेळायला सुरुवात केली. जेव्हा त्यांच्या वडिलांनी या खेळात त्यांची आवड पाहिली तेव्हा त्यांना खरी हॉकी स्टिक मिळाली.

टेकचंदने मोठे झाल्यावर हॉकीची आवड कायम ठेवली. टेकचंद यांचा खेळ बघून त्यांचं DHA संघात सिलेक्शन केलं गेलं. जिल्हा हॉकी असोसिएशनच्या संघात खेळतांना भोपाळ, दिल्ली, चंदीगडसह अनेक शहरांमध्ये त्यांनी स्पर्धा खेळल्या आणि जिंकल्या.

मेजर ध्यानचंद गुरु म्हणून लाभले

1960 साली मेजर ध्यानचंद एमआरसी सागर इथे होते, यावेळी त्यांनी सागर आणि जबलपूरच्या हॉकीपटूंना बोलावून प्रशिक्षण दिले. त्या मोजक्या खेळाडूंमध्ये टेकचंद यांचाही समावेश होता. मेजर ध्यानचंद 3 महिने तिथेच राहिले आणि त्यांनी खेळाडूंना अशा टिप्स दिल्या की त्यांचे आयुष्यच बदलून गेले.

एका वर्षानंतर भोपाळमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा झाली. या स्पर्धेत अनेक देशांतील हॉकी संघ सहभागी झाले होते. यादरम्यान टेकचंद यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. हा सामना हॉलंड विरुद्ध होता. भारतीय संघाने हा सामना मोठ्या फरकाने जिंकलेला.

टेकचंद यांनी सांगितले की, त्या काळात सागरमध्ये स्पोर्टिंग आणि सागर ब्लूज असे दोन मोठे हॉकी क्लब होते. वेस्ट सागर स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष प्रोफेसर डब्ल्यू.डी होते. आपल्या मॅट्रिकनंतर शिक्षण सोडलेल्या टेकचंद यांनी कधीच प्रोफेसर डब्ल्यू.डी यांच्याकडे शिक्षण घेतलं नव्हतं, पण हॉकी खेळतांना ते सरांना भेटायचे. दरम्यान, टेकचंदच्या वडिलांचे निधन झाल्याने ते एकटे पडले. उदरनिर्वाहासाठी त्यांना खासगी नोकरी करावी लागली.

परिस्थितीने हॉकीतून सुटका करून घेतली

जीवनसंघर्षाने त्यांच्या हातातील हॉकी स्टिक हिसकावून घेतली आणि या खेळापासून त्याचे अंतर वाढू लागले. त्यांच्याकडे असलेली सर्व पदके, प्रमाणपत्रे किंवा पुरस्कार नष्ट झाल्याचे टेकचंद सांगतात. ते म्हणतात की ते सध्या ज्या स्थितीत आहे त्याबद्दल त्यांना तक्रार नाही, पण सध्याची हॉकीची दुर्दशा बघून दुःख होतं. भारतात खेळाचे व्यापारीकरण झाल्यापासून हॉकीचा नाश झाला आहे, अस त्यांचे मत आहे.

सरकारकडून आशा नाही

टेकचंद हे हॉकी रेफ्री मोहर सिंग यांचे गुरू आहेत. टेकचंदने त्यांना लहानपणी हात धरून हॉकी खेळायला शिकवले, आज त्यांची अवस्था तशी दिसत नाही, असे मोहर सिंग सांगतात. मैदानात डिर्व्हिलिंग करताना विरोधी संघातील खेळाडूंना थरथर कापायला लावणाऱ्या टेकचंदचे आज हात थरथरतात.आज त्यांचे थरथरणारे हात धरायला कोणी नाही. टेकचंद यांना सरकारकडून सन्मान मिळावा एवढीच त्यांची इच्छा आहे, असे मोहर सिंग यांनी सांगितले.

टेकचंद यांचं कुटुंब

टेकचंद यांना पत्नी आणि मुले नाहीत. ते आपल्या कुटुंबाच्या मालकीच्या पडक्या घरात राहतात. त्यांचे भाऊ दोन वेळचे अन्न पाठवतात. त्यांच्या घराची परिस्थिती अशी आहे की हॉकीशी संबंधित अविस्मरणीय गोष्टीही त्यांच्याकडे उरल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT