krishna-prakash Sakal
महाराष्ट्र बातम्या

कृष्ण प्रकाश यांच्या 'त्या' व्हायरल पत्राची गृहसचिवांमार्फत होणार चौकशी

कृष्ण प्रकाश यांच्या व्हायरल पत्राची गृहसचिवांमार्फत होणार चौकशी होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी: पिंपरी-चिंचवडचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दोनशे कोटी उकळल्याच्या व्हायरल झालेल्या पत्राची राज्याच्या गृह सचिवांमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दिली.

काय आहे प्रकरण:

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त त्यांनी दीड वर्षांच्या कालावधीत वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला होता. त्यामुळे पोलिस दलातच नव्हे,तर शहरातही प्रचंड खळबळ उडाली होता. (Home Secretary will investigate Krishna Prakash's viral letter)

या पत्रातील दाव्यानुसार या अवैध वसूलीत चार एसीपी आणि चार पत्रकार यांचाही हातभार आहे. आपले काळेधंदे उघड होऊ नयेत, तसेच आपली प्रतिमा उंचावलेली ठेवण्यासाठी या पत्रकारांना दरमहा लाखो रुपये दिले जात असल्याचा आरोप लेटरमध्ये करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील आयुक्तांच्या कारभाराबाबत वक्तव्ये करणारी पत्र व्हायरल होण्याचा परंपरा कायम राहिली आहे. या आधीच्या आयुक्तांबाबतही अशीच पत्रे व्हायरल झाली होती. कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तपदावरून व्हीआयपी सुरक्षा विभागात बदली झाली आहे. ही बदली रद्द करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याआधीच त्यांच्यावर वार करण्यात आले आहेत. या पत्रामागे पोलिस दलातील वैमनस्य तर कारणीभूत नाही ना, अशीही चर्चा आहे.

व्हायरल लेटरवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची प्रतिक्रिया:

पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Krishna Prakash) यांच्यावर 200 कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप करणारे पत्र व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता या सर्व प्रकरणावर सध्या मुंबईचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम करत असलेल्या कृष्ण प्रकाश यांनी प्रतिक्रिया दिली असून, व्हायरल होणारं हे पत्र खोटं असल्याचे म्हटले आहे. तसेच हे खोटे पत्र लिहणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार डोंगरे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT