Pankaja Munde esakal
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde: पंकजा मुंडेंचे पुनर्वसन करुन भाजपला कसा फायदा होणार? फडणवीसांची विधानसभेसाठी चाणक्यनीती काय?

Pankaja Munde: पंकजा मुंडे यांचा पराभव चांगलात जिव्हारी लागला आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंथ कोण उमेदवार द्यावा, अशी चर्चा सुरु आहे.

Sandip Kapde

Pankaja Munde:

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली. बीड लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाची जोरदार चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ही पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी विनंती केली आहे. राजकारणातील चाणक्य ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची यामागे काय रणनीती आहे, असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे. (devendra Fadnavis plan for assembly election 2024 )

महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद रंगला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाची भाजपवर मोठी नाराजी देखील आहे. तर पंकजा मुंडे यांचा पराभव चांगलात जिव्हारी लागला आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंथ कोण उमेदवार द्यावा, अशी चर्चा सुरु आहे.

सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर साम टीव्हीशी बोलताना म्हणाल्या, विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना भाजपला महाराष्ट्रातील कणाकणांचा विचार करावा लागणार आहे. मराठा समाज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे भाजपपासून दूर गेला असेल. तर भाजपला कायम पाठिराखा असलेल्या ओबीसी समाजाला जवळ करणं आणि तुम्ही आमचे आहात हे दाखवणं, गरजेचं आहे.

ओबीसी समाजाचे गोपीनाथ मुंडे नेते होते त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्याप्रति समाजात आदर आहे. तसेच पंकजा मुंडेंची आक्रमक प्रतिमा हे लक्षात घेता. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाला, विशेषता देवेंद्र फडणवीस यांना पंकजा यांना मानाचं पद दिलं जावं, असं वाटत असावं.

लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस नव्याने काही रचना करत आहेत. ती रचना करताना त्यांना जुने साथिदारांना जवळ करायचं आहे. पंकजा मुंडे यांना विधानपरिषद आणि राज्यसभेवर पाठवण्यासाठी महाराष्ट्र भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी तीनवेळा केंद्राला मागणी केली होती. मात्र केंद्राला वाटत होते. त्यांनी जनतेतून निवडून यावे. (How BJP benefit rehabilitating Pankaja Munde)

भाजपला कसा फायदा होणार?

महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात ओबीस मतदार मोठ्या प्रमाणात आहे. ओबीसी समाजाचे नेते म्हणून ९५ सालाच्या आधीपासून गोपीनाथ मुंडे समोर आले होते आणि त्यांचा वारसा पंकजा मुंडे चालवतात, अस सर्वांना वाटतं.

जरी धनंजय मुंडे महायुतीत आले असले तरी खरा वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. भाजप मराठा समाजाला आरक्षण देत आहे तर आपल्यासाठी काय करत आहे, असं समाजातील लोकांना वाटत. त्यामुळे ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT