guntha kharedi vikri Canva
महाराष्ट्र बातम्या

मूळ मालकाशिवाय जागा व जमिनीची खरेदी-विक्री? हजारो दस्तात तेच साक्षीदार; बनावट महिला उभी करून जागेवर कब्जा; प्रांताधिकारी, अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी

सामाईक सातबारा असतानाही एक हिस्सा सहमतीविनाच विकला आणि आता पुन्हा राहिलेल्या जागेवर त्या व्यक्तीने पुन्हा स्वत:सह मुलांची नावे लावून घेतली. वास्तविक पहाता मूळ मालक किंवा सातबारावरील सर्वजण उपस्थित नसतानाही असे व्यवहार होतातच कसे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : बनावट कागदपत्रांद्वारे जागा हडप केल्याच्या तक्रारी यापूर्वीदेखील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. आता काहीजण म्हणतात, सामाईक सातबारा असतानाही त्यातील एक हिस्सा आमच्या सहमतीविनाच विकला आणि आता पुन्हा राहिलेल्या जागेवर त्या व्यक्तीने पुन्हा स्वत:सह मुलांची नावे लावून घेतली. वास्तविक पहाता मूळ मालक किंवा सातबारावरील सर्वजण उपस्थित नसतानाही असे व्यवहार होतातच कसे, हा मूळ प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून आता सर्वच बाबींसाठी आधारलिंक करायला सांगितले जाते. मग, ज्यांच्या नावे सातबारा त्यांचा आधार क्रमांक सातबारा उताऱ्याला लिंक केल्यास जागा-जमीन खरेदीतील बनावटगिरी थांबेल, असा विश्वास अनेकांना आहे. ज्यावेळी खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो, त्यावेळी बॅंकेचा बोजा असतानाही तो पोकळ असल्याचे दाखवून व्यवहार होतात ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे मुद्रांक कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसलेले काहीजण बहुतेक व्यवहारात तेच ओळखीचे साक्षीदार म्हणून घेतले जातात. अशावेळी समोर होत असलेला व्यवहार पारदर्शक आहे की नाही, याची खातरजमा त्याच कार्यालयाकडून व्हायला हवी, अशीही अनेकांची मागणी आहे.

फसलेल्यांना ‘या’ ठिकाणी मिळेल न्याय

रेल्वे लाईन परिसरातील एक जागा २० जणांनी मिळून खरेदी केली आणि त्यांनी खरेदीपूर्व जाहीर नोटीस देखील दिली होती. तरीपण, आता त्या जागेत एकाने अतिक्रमण केल्याचे तेथील लोकांनी ‘सकाळ’ला सांगितले. दुसरीकडे विडी घरकूल, जुळे सोलापुरातील पूनम नगर, सोरेगाव परिसर अशा ठिकाणच्या नागरिकांनीही आमच्या जागांवर दुसऱ्यानेच कब्जा केला, काहींनी आमच्या उताऱ्यावर परस्पर इतरांची नावे लावली, अशाही तक्रारी आहेत. त्यांना पहिल्यांदा प्रांताधिकाऱ्यांकडे अपील करण्याची तरतूद असून त्यानंतर पुढे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडेही दाद मागता येते.

बनावट महिला उभी करून जागेवर कब्जा

बुऱ्हाणपूर (ता. अक्कलकोट) येथील गौस जब्बार पिरजादे याने निखत फरविन फिदाहुसेन मणियार (रा. विजयपूर, सध्या सोलापूर) यांचे आधारकार्ड मिळवून त्यांच्या ठिकाणी दुसरी महिला उभी करून महापालिकेच्या मिळकत करावर नोंद लावली. त्यानंतर ८ जुलै २०२२ रोजी त्या वर्षीचा मिळकत कर भरला. त्यानंतर दुसऱ्या महिलेला उभे करून ७ जुलै २०२२ रोजी १०० रुपयांच्या बॉण्डवर व कब्जा पावती करून त्यासाठी साक्षीदार न वापरता ॲड. डी. एन. कोडम यांची स्वाक्षरी व शिक्का वापरून त्यांना ओळखते असे दाखवून नोटरी बनावट कब्जा पावती केली. त्यांनतर त्या जागेवर शेड मारून बेकायदा अतिक्रमण केल्याची फिर्याद इम्रान युनुस शेख (रा. सिद्धेश्वर नगर भाग २, मजरेवाडी) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यावरून गौस पिरजादे, निखत मणियार यांच्यासह त्यांच्या अन्य साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस उपनिरीक्षक गाढवे तपास करीत आहेत.

प्रांताधिकारी अन्‌ अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागता येते

खरेदीखत किंवा अन्य कायदेशीर कागदपत्रे पाहूनच मंडलाधिकाऱ्यांकडून नोंद लावण्याची कार्यवाही केली जाते. तरीपण, ज्यांना वाटते की चुकीच्या पद्धतीने त्याठिकाणी कार्यवाही झाली आहे, त्यांना प्रांताधिकारी व पुढे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करण्याचा हक्क आहे.

- नीलेश पाटील, तहसीलदार, उत्तर सोलापूर

------------------------------------------------------------------------------------

व्यवहारावेळी प्रत्येकांनी खरबदारी घ्यावी

जागा किंवा जमिनीची विक्री करणारा म्हणजेच मालक व खरेदी घेणारा, यांनी आपला दस्त पारदर्शक व्हावा, यासाठी ओळख म्हणून जवळचे साक्षीदार घ्यावेत. जागा-जमीन खरेदी किंवा विक्री करताना आपली फसवणूक होणार नाही, याची प्रत्येकांनी खबरदारी घ्यायला हवी.

- प्रकाश खोमणे, जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT