alcohol esakal
महाराष्ट्र बातम्या

अवैध दारू बाळगणं हा गुन्हा नाही; हायकोर्ट असं का म्हणालं माहितीय?

१३२ दारूच्या बाटल्या जप्त केल्या पण..

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: अवैध दारू (Alcohol) बाळगल्या प्रकरणी दिल्ली पोलिस (Police) आणि उत्पादन शुल्क (Excise) अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीच्या घरावर छापा टाकला. यात त्याच्याकडून १३२ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र दिल्ली (Delhi) उच्च न्यायालयाने (High Court) याचिकाकर्त्याविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द केला. याबाबत उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, उत्पादन शुल्क नियमांनुसार २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती ९ लिटर व्हिस्की, वोडका, जिन, रम आणि १८ लिटर बिअर स्वत:कडे ठेवू शकते. यासोबत वाइन आणि अल्कोपॉपही ठेवू शकतात. कायदेशीररित्या परवानगी असलेल्या, मर्यादेपेक्षा जास्त दारू बाळगल्याचा आरोप असणारा गुन्हा रद्द करताना न्यायालयाने हि माहिती दिली.

पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी ज्या व्यक्तीला ताब्यात घेतले त्या व्यक्तीचा कोणताही गुन्हा सिध्द झाला नाही.

याचिकाकर्त्याकडे १३२ दारूच्या बाटल्या सापडल्या

न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी सांगितले की, याचिकाकर्त्याकडे १३२ दारूच्या बाटल्या सापडल्या म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. उत्पादन शुल्क कायदा २००९ नुसार या व्यक्तीकडून कायद्याचे उल्लंघन झालेले नाही. ज्या बाटल्या जमा केल्या गेल्या त्यामध्ये ५१.८ लिटर व्हिस्की, वोडका, जिन, रम तसेच ५५.४ लिटर बिअर होती. त्यामुळे हा गुन्हा होऊ शकत नाही.

पोलिसांनी छापा टाकला पण..

पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी ज्या व्यक्तीला ताब्यात घेतले त्या व्यक्तीचा कोणताही गुन्हा सिध्द झाला नाही. याउलट त्यांना त्रासच झाला. सध्याच्या प्रकरणात बेकायदेशीर दारूचा साठा असल्याच्या माहितीच्या आधारे छापा टाकला होता. यात तळघरात असलेल्या बार काउंटरमधून भारतीय आणि विदेशी ब्रँडच्या एकूण १३२ दारूच्या बाटल्या कोणत्याही परवान्याशिवाय सापडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT