ration card esakal
महाराष्ट्र बातम्या

रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा? जाणून घ्या पध्दत

सकाळ डिजिटल टीम

जर तुमचा रेशन कार्ड नंबर तुम्हाला माहिती नाही? तुम्हाला रेशन वेळेवर मिळत नाही? किंवा तुमची फसवणूक होतेय असे वाटत आहे. ऑनलाईन रेशनिंग नंबर कसा पाहायचा? तसेच रेशनिंग संदर्भातील नियमांची माहिती करून घेण्यासाठी ही बातमी अवश्य वाचा. आणि ऑनलाईन पध्दत जाणून घ्या... (how-to-find-ration-card-number-online-marathi-news)

असा पाहा ऑनलाईन रेशन कार्ड नंबर-

सगळ्यात आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करा.

त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर दिसेल

या वेबसाईटवर उजवीकडे ऑनलाईन सेवा दिसेल

त्यात सगळ्यात शेवटी असलेल्या ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

या पेजवरील उजवीकडील 'मराठी' या ऑप्शनवर क्लिक करा.त्यानंतर तुम्हाला मराठीत माहिती दिसून येईल.मग वरच्या बाजूच्या Sign in किंवा Register या रकान्यातील ऑफिस लॉग इन किंवा सार्वजनिक लॉग इन या दोन पर्याय दिसतील. यापैकी सार्वजनिक लॉग इन या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकायचे आहेत. मग तुम्ही भाषा इंग्लिश किंवा मराठी पण सिलेक्ट करू शकता

अशी भरा रेशन कार्ड माहिती

त्यानंतर खाली तुम्हाला दोन पर्याय असतील, एक म्हणजे नोंदणीकृत युझर आणि दुसरा नवीन युझर. जर आपण पहिल्यांदाच या साईटवर येत आहात तर आपल्याला नवीन युझर हा पर्याय निवडायचा आहे. मग एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. Do you have ration card आणि No ration card असे दोन पर्याय तुम्हाला दिसतील. यातल्या No ration card या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर सुरुवातीला तुम्हाला तुमचं स्थानिक भाषेतलं नाव, ते तुम्ही मराठीत लिहू शकता, त्यानंतर आधारवर जे नाव आहे आणि ते जसं आहे तसंच लिहा. त्यानंतर आधार नंबर, मोबाईल नंबर टाका. मग मेल आयडी असेल तर तो लिहायचा आहे, त्यानंतर आधार कार्डवरील जन्मतारीख टाका.नंतर लिंग निवडायचं आहे आणि सगळ्यात शेवटी कॅप्चा टाका. ही माहिती भरून झाली की Verify Aadhar या पर्यायावर क्लिक करा

मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर बघताना...

यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही मोबाईल वर हे पाहत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यात वरती लाल अक्षरात एक मेसेज दिसेल. आणि लॅपटॉपवरती किंवा कॉम्प्युटर वर हे Verify Aadhar या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन तुमची स्क्रीन झूम 100 किंवा त्याहून कमी टक्क्यांवर आणावी लागेल. त्यानंतर तुम्हाला लाल अक्षरातला मेसेज स्पष्टपणे दिसेल. त्यानंतर हा मेसेज असेल. - Aadhar card Already exist for another RC. Details are as follows-District Name: , Village Name: , RC ID: and MEMBERID:

म्हणजेच तुमचा आधार कार्ड रेशन कार्डला ऑलरेडी लिंक केलेलं आहे. पुढे तुमचा जिल्हा, गावाचं नाव आणि आरसी आयडी म्हणजे बारा अंकी रेशन कार्ड नंबर दिलेला असेल.

असं पाहा ऑनलाईन रेशन कार्ड

तुम्हाला तुमचा RC नंबर मिळाला की तुम्ही तुमचं रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला rcms.mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे. एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. पेजवरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर तुम्ही क्लिक करा. कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक करा. रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता ऑनलाईन जो रेशन कार्ड नंबर पाहिला तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो टाकला की समोरील view report वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डसंबंधित माहिती ओपन होईल. सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिलेला आहे. यावर क्लिक केलं की तुमचं रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT