Students_Exam 
महाराष्ट्र बातम्या

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, 2021मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेचे भरा फॉर्म; वाचा सविस्तर बातमी

सकाळ वृत्तसेवा

HSC Exam 2021: पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2021मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता येत्या मंगळवारपासून (ता.15) परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या अंतर्गत नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांच्या नियमित विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज सरल डेटाबेसवरून 15 डिसेंबर 2020 ते 4 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. तर बारावी व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार आणि तुरळक विषय घेऊ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 5 जानेवारी ते 18 जानेवारी 2021 दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने 'www.mahahsscboard.in' या संकेतस्थळावर भरायचा आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत अर्ज भरायचा आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :
- 'कोविड-19'च्या पार्श्‍वभूमीवर आणि विशेषत: आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.
- उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेतील नियमित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यासाठी सरल डेटाबेसमध्ये विद्यार्थ्यांची अद्यायावत नोंद असणे आवश्‍यक.
- सरल डेटावरूनच नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत.
- व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची माहिती सरल डेटामध्ये नसल्याने त्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाईनच भरावेत.
- अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क चलनाद्वारे भरण्यात यावे.
- यावर्षी नव्याने फॉर्म नंबर 17 द्वारे नोंदणी करणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांची 2021मधील परीक्षेचा अर्ज भरण्याचा कालावधी स्वतंत्रपणे निश्‍चित केला जाणार आहे.
- फेब्रवारी-मार्च 2020 अथवा नोव्हेंबर/डिसेंबर 2020मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसुधार योजनेतंर्गत अर्ज भरून परीक्षेस प्रविष्ठ होता येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT