Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Latest News : 'अजितदादांना सकाळी भेटले पण...',सुप्रिया सुळेंचं 'त्या' भेटीवर स्पष्टीकरण

अंकिता खाणे (Ankita Khane)

NCP Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड आणि शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झालेत. त्यांच्यासह त्यांच्या एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. दरम्यान अजित पवारांच्या या बंडामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच शरद पवारांच्या सहभागा शिवाय नेते असं करणार नाहीत असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत, तर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी अजित पवारांच्या निर्णयावेळी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या असं शेळके यांनी म्हंटलं होतं.

तर या संपूर्ण चर्चेवर सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. अजित पवारांच्या निर्णयाबद्दल मला माहित नव्हतं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटलं आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी रविवारी घडलेला घटनाक्रम सविस्तर सांगितला आहे.(Latest Marathi News)

त्या बोलताना म्हणाल्या की, 'रविवारी मी बराच वेळ अजितदादांच्या निवासस्थानी होते, आमच्यामध्ये सविस्तर चर्चाही झाली. पण दादांच्या मनात काय चाललंय याबद्दल मला काही माहिती नव्हतं. काही वेळानं एक-एक करून आमदार देवगिरी बंगल्यावर येत होते. मी निघाल्यावर अजितदादा आणि त्यांचे समर्थक राज भवनावर पोहोचले, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे.(Latest Marathi News)

त्या पुढे म्हण्ल्या कि, रविवारी मी जेव्हा देवगिरीवर गेले तेव्हा अजित पवारांना भेटायला अनेक आमदार आले होते. पण मला वाटलं ते प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीससंदर्भात चर्चा करण्यासाठी आलेत. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दाखवली होती. मी देवगिरी वरून निघाल्यावर अजित पवार राज भवनाकडे गेल्याची माहिती मिळाली.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi CM Atishi: दिल्लीत आता आतिषी सरकार! मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी संपन्न; नव्या मंत्रिमंडळात कोणाचा समावेश? जाणून घ्या

Latest Marathi News Updates : हरियाणामध्ये काँग्रेस 60 अन् भाजप 20 जागा जिंकणार - सत्यपाल मलिक

मोदींकडून अवास्तव कौतुक; सेहवागच्या कर्मचाऱ्याला लाखोंचा भूर्दंड, विरुच्या ट्विटनं खळबळ

Bigg Boss Marathi 5 : "ती सगळं फुटेजसाठी करते" ; पत्रकारांसमोरच निक्की-जान्हवीचं वाजलं

Lebanon Pager Blast: वायनाडच्या शिंप्याचा मुलगा नॉर्वेत कसा पोहचला? का चर्चेत आहे जोस टेलर

SCROLL FOR NEXT