PM Modi Speech Esakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi Speech: 'मी पुन्हा येईन...', लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) लाल किल्ल्यावरून तिरंगा ध्वज फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी अनेक बाबींवर भाष्य केलं आहे. तर यावेळी त्यांनी पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा येईन असंही म्हटलं आहे.

2014 मध्ये मी बदल घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले होते. तुम्ही देशवासीयांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी दिलेले वचन विश्वासात बदलले. 2019 मधील माझ्या कामगिरीच्या जोरावर तुम्ही मला पुन्हा आशीर्वाद दिलात. बदलामुळे मला आणखी एक संधी मिळाली. मी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करीन असंही ते पुढे म्हणाले आहेत.

2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी येणारी पाच वर्षे हा सर्वात मोठा सुवर्ण क्षण आहे. पुढच्या वेळी 15 ऑगस्टला मी या लाल किल्ल्यावरून देशाचे यश आणि विकास तुमच्यासमोर मांडणार आहे. येत्या 15 ऑगस्टला पुन्हा येईल. मी फक्त तुमच्यासाठी जगतो, मी तुमच्यासाठी घाम गाळतो, कारण तूम्ही माझा परिवार आहात असंही पुढे मोदी म्हणाले आहेत.

महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार

जेव्हा आयकर सूट मिळते, तेव्हा त्याचा सर्वाधिक फायदा नोकरी करणाऱ्या वर्गाला होतो. जग महागाईच्या संकटाला तोंड देत आहे. आम्ही जगभरातून आयात देखील करीत आहोत. भारताने महागाई नियंत्रणासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. देशाला महागाईपासून मुक्त करणे हे आमचे ध्येय आहे, असंही मोदी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Wardha: मराठीतून भाषणाला सुरुवात...काँग्रेसने SC,ST,OBC यांना पुढं जाऊ दिलं नाही, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?

IND vs BAN, 1st test: भारताला धक्का! मोहम्मद सिराजला सामना सुरू असतानाच सोडावं लागलं मैदान, जाणून काय झालं

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

आग अन् किटाळ! भारतीय गोलंदाजाच्या वेगवान माऱ्याने स्टम्प्स उखडून फेकले; फलंदाज सैरभैर झाले, Video

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या वसतिगृहात जीवन संपवले

SCROLL FOR NEXT