Devendra fadanvis sakal
महाराष्ट्र बातम्या

मी पुन्हा येईन! राज्यसभा, विधान परिषदेनंतर आता सत्तापरिवर्तनाचा प्लॅन?

भाजपचे १०६ आमदार असूनही राज्यसभा निवडणुकीत १२३ आमदारांनी भाजपला मतदान केले. त्यावेळी अपक्षांसह १७ आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला १३४ आमदारांनी मतदान केले. गुप्त पध्दतीने मतदान असल्याने यावेळी २८ आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केले.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी ठरली. राज्यसभेला तिसरा तर विधान परिषदेला पाचवा उमेदवार विजयी होईल, एवढी ताकद नसतानाही त्यांना यश मिळाले. आता राज्याच्या सत्तेसाठी २८८ पैकी १४४ आमदारांची गरज लागते. भाजप हळुहळु त्या संख्येपर्यंत आगेकूच करू लागला आहे. त्यामुळे राज्यात ‘मी पुन्हा येईन’ हे खरे होते की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. राज्यसभेला भाजपला १२३ तर विधान परिषदेला १३४ मते मिळाली आहेत. वास्तविक पाहता भाजपकडे १०६ आमदार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच काँग्रेस व राष्ट्रवादीवर आक्रमक टिका केली. भाजपसोबत अनेकदा मतभेद होऊनही त्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली नाही. मात्र, आता बदलत्या राजकारणात शिवसेनेने परंपरागत विरोधातील काँग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री झाले. सुरवातीचे काही महिने सरकार सुरळीत कामकाज करीत असतानाच कोरोनाचे संकट आले. त्यात मुख्यमंत्र्यांना मणक्याचा त्रास आणि कोरोनामुळे ते शक्यतो बाहेर पडलेच नाहीत. ज्या जिल्ह्यात शिवसेना स्ट्राँग आहे, त्याठिकाणी राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडून निधी वाटपात दुजाभाव होत असतानाच मुख्यमंत्र्यांची भेट दुर्मिळच झाली. काँग्रेसचेही ठरावीक नेते सोडले, तर आमदारांना अपेक्षित किंमत मिळत नाही, अशी चर्चा झाली. याच परिस्थितीचा फायदा घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या नाराजांना हेरून आपलेसं करण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीतून स्पष्ट झाले. तत्पूर्वी, माजी मंत्री तथा राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने सरकार पडेल, असे भाकीत करीत होते. त्याची पायाभरणी या निवडणुकीतून दिसून आली, असेही बोलले जात आहे.

आमदारांची नाराजी म्हणजे सत्तापरिवर्तनाची नांदी

राज्यसभेनंतर विधान परिषदेत भाजपकडे अपेक्षित मताधिक्य नसतानाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे दोन्ही निवडणुकीत मोठा विजय मिळाला. महाविकास आघाडीतील आमदारांसह शेतकरी, कामगारांसह वंचित घटकांना फडणवीस हेच मुख्यमंत्री असावेत, अशी अपेक्षा असल्याचे निकालातून स्पष्ट दिसते.

- विजयकुमार देशमुख, माजी मंत्री तथा भाजप आमदार, सोलापूर

भाजपला साथ देणारे ‘ते’२८ आमदार कोणाचे?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकत्रित लढूनही मुख्यमंत्रीपदासाठी भाजप-सेनेची युती तुटली आणि भाजपच्या अयशस्वी प्रयत्नानंतर शिवसेनेने विरोधकांशीच हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. तत्पूर्वी, मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची साथ सोडू इच्छिणाऱ्या शिवसेनेतील नेत्यांची खंत ओळखून विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादीने पक्षप्रमुखालाच मुख्यमंत्री केले. आता आघाडी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. दोन वर्षांनी निवडणुका असल्याने तिन्ही पक्षातील आमदारांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. अनेक विधानसभा मतदारसंघात तिन्ही पक्षाचेच उमेदवार एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. भाजपपेक्षाही त्या उमेदवारांना महाविकास आघाडीतील पक्षातील उमेदवारांकडूनच अधिक धोका आहे, अशी स्थिती आहे. आगामी निवडणुकीत भाजपच्या मदतीने आपण पुन्हा आमदार होऊ शकतो, असा विश्वास काहींना वाटत आहे. त्यातूनच ही नाराजी राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत पहायला मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे. पण, आता भाजपला मतदान करणारे ते ३८ आमदार कोण, याचा शोध तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी घ्यायला सुरु केले आहे. दुसरीकडे भाजपने १४४ चा जादुई आकडा गाठण्याच्या दृष्टीने कंबर कसल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

‘मी पुन्हा येईन’ची खंत

भाजप-सेना एकत्रित लढल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तुलनेत सर्वाधिक जागा मिळाल्या. विधानसभेच्या प्रचारात अनेक ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे मी ‘पुन्हा येईन’ म्हणाले होते. पण, ऐनवेळी युती तुटली आणि भाजपला विरोधी पक्षात राहावे लागले. त्यानंतर अनेकांनी त्या वाक्याचा दाखला देत फडणवीस यांची खिल्ली उडविली. ती खंत मनात ठेवून फडणवीसांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आपणच असल्याचे सिध्द करण्यासाठी कोरोना असो वा महापूर, अतिवृष्टीच्या काळात राज्यभर दौरे केले. जनतेची सहानुभुती आपल्यालाच अधिक असल्याचे त्यांनी दाखवून दिले. आता सरकारमधील आमदारही नाराज असल्याचे त्यांनी दोन्ही निवडणुकीत सिध्द करून दाखविले. त्यामुळे सरकारला धोका असल्याचेही बोलले जात आहे. तरीदेखील सरकार पाच वर्षे टिकेल, असे तिन्ही पक्षातील नेते ठामपणे सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT