मुंबईः मागच्या काही वर्षांपासून भारतातील ईव्हीएम यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशाच्या निवडणूक आयोगाकडे कायम संशयाच्या नजरेने बघितलं जातं. त्यातच आता एका माजी मंत्र्याने केलेल्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
''ईव्हीएममध्ये घोटाळा झाला तर मुख्य निवडणूक आयुक्तांचा खून करु'' असं विधान बुलडाणा येथील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केलं होतं. या प्रकरणी सुबोध सावजी यांच्याविरोधात बुलडाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, सुबोध सावजी यांनी महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा मिळतील, अशी आशा व्यक्त केली आहे. याचवेळी बोलताना त्यांनी ईव्हीएम मशिनमध्ये घोळ झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करु, असं वादग्रस्त विधान केलं.
त्यांच्या विधानामुळे आश्चर्य व्यक्त होत असून त्यंच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. 'साम' टीव्हीने हे वृत्त दिले आहे. यावर निवडणूक आयोग काही कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.