Gopichand Padalkar 
महाराष्ट्र बातम्या

Gopichand Padalkar: 'मी कोणाची माफी मागत नसतो'; 'लबाड लांडगा' नोटिसीवर पडळकरांनी स्पष्टच सांगितलं

कार्तिक पुजारी

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बेताल वक्तव्य करुन पवार कुटुंबाची बदमानी केल्यामुळे अॅड. असिम सरोदे यांच्या मार्फत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना नोटीस पाठवण्यात आलीये. यावर पडळकरांनी प्रतिक्रिया दिली असून अद्याप मला कसलीही नोटीस मिळाली नसल्याचं ते म्हणाले आहेत.(i will not apologize said bjp leader gopichand padalkar)

मी कोणाचीही माफी मागणार नाही. मला अजून नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे नोटीस मिळाल्यावर यावर सविस्तर उत्तर देईन, असं पडळकर म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना पातळी सोडली होती. यावरुन त्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना सात दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ॲड.असीम सरोदे आणि अन्य कायदेतज्ज्ञांमार्फत सदर नोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये सात दिवसात लेखी माफी मागण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे यावर गोपीचंद पडळकर काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

अजित पवार म्हणजे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत आणि सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक, असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी 23 सप्टेंबरला केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. पण, पडळकर यांनी यास नकार दिला आहे. त्यामुळे पवार-पडळकर वाद वाढला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT