IAS Pooja Khedkar Latest News : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर कारवाई झाली आहे. तिचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आलेला आहे. या प्रकरणी आमदार बच्चू कडू यांनी बोगस दिव्यांगांना इशारा दिला असून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र शोधून काढणार असल्याचं म्हटलं आहे.
दिव्यांगांसाठी लढा देणारे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी पूजा खेडकरला जन्मठेपेची शिक्षा द्या, अशी मागणी केली आहे. ते म्हणाले की, यूपीएससीसारखी संस्था अशा पद्धतीने वागत असेल तर आता काय राहिलं? हायकोर्टाचे निकाल लोक बदलायला लागले आहेत.. या प्रकरणात पूजा खेडकरला तातडीने पदावरुन काढून जन्मठेपेची शिक्षा द्यायला पाहिजे. कारण पुन्हा कुणी असा गुन्हा करणार नाही.
बच्चू कडू पुढे म्हणाले की, पूजा खेडकर ही दिव्यांग नसताना तिने दिव्यांग आरक्षणाचा फायदा घेतला, अशा झारीतल्या शुक्राचार्यांना आपण शोधून काढू.. सामान्य उमेदवार दिव्यांग प्रमाणपत्राचा फायदा नोकरीसाठी घेत असल्याची माहिती मला समजली आहे. यामध्ये एक समिती गठीत करत असून अशा लोकांना शोधून काढणार आहे.
ज्या-ज्या लोकांनी फसवणूक करुन लाभ मिळवले, अशांवर सुधारित कायद्यानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल होणार आहेत, असंही कडूंनी सांगितलं.
पूजा खेडकर हिने तर तीन दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचं प्रकरण पुढे आलं आहे. या प्रकरणाची समितीमार्फत चौकसी सुरु आहे. तिकडे दिव्यांग आयुक्तालयाने खेडकर प्रकरणाची माहिती मागवली आहे.
दरम्यान, पूजा खेडकरवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने ११ जुलै रोजी सादर केलेल्या अहवालानंतर केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी डीओपीटीने तिचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आल्याचे आदेश दिले आहेत. पूजा खेडकरचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. अशाप्रकारची देशाच्या इतिहासात ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जातंय. Department of Personnel & Training या केंद्र सरकारच्या नोडल एजन्सीने याबाबत आदेश काढले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.