वाशिम : आयएएस अधिकारी पूज खेडकर या आपल्या अनेक कारनाम्यांमुळं सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. याच कारनाम्यांच्या चौकशीसाठी पोलीस त्यांच्या वाशिम इथल्या घरी गेले होते. पोलिसांनी त्यांची चार तास चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. पण पोलीस स्वतःहून आपल्या घरी आले नव्हते तर आपणच पोलिसांनी घरी बोलावलं होतं, असं पूजा खेडकर यांनी म्हटलं आहे. (IAS Pooja Khedkar clear it why police come to her house for enquiry or any other else)
पत्रकारांशी बोलताना खेडकर म्हणाल्या, "पोलिसांनी माझी चौकशी केली नाही तर मी पोलिसांना बोलावलं होतं. पोलिसांकडं माझं काही काम होतं त्यामुळं मीच एका महिला पोलिसाला बोलावून घेतलं होतं. याशिवाय कुठल्याही चौकशीसाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी पोलीस माझ्या निवासस्थानी आले नव्हते, त्यामुळं याबाबत कुठलीही अफवा पसरवू नका"
खेडकर यांची चौकशी करणाऱ्या कमिटीला त्या कधी समोऱ्या जाणार आहेत याबाबत माहिती देणं त्यांनी टाळलं. त्यांनी म्हटलं की, "कमिटीकडून होणारी चौकशी ही गोपनियत असते. त्यामुळं लोकांसोबत किंवा मीडियासोबत ते शेअर केलं जात नाही. तसंच जेव्हा या कमिटीची चौकशी पूर्ण होईल तेव्हा त्याची माहिती सर्वांपुढे येईलच"
आपल्याबाबत रोज नवनवीन फेकन्यूज समोर येत आहेत, असा दावाही यावेळी पूजा खेडेकर यांनी केला. अशी कोणी व्यक्ती असते का की ज्याच्या रोज नव्या काहीतरी बातम्या समोर येत राहतात. पण आता हे इतकं वाढलं आहे की, त्यामुळं बदनामीचं प्रमाण वाढतचं चाललं आहे. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यानं मीडियानं कोणतीही चुकीची माहिती पसरु देऊ नये, असं आवाहनही यावेळी पूजा खेडकर यांनी केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.