Pooja Khedkar  
महाराष्ट्र बातम्या

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर मानसिक आजारी! कोणत्या जिल्हा रुग्णालयाने दिलं होतं सर्टिफिकेट? धक्कादायक माहिती समोर

कार्तिक पुजारी

मुंबई- प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर ही सध्या चांगलीच चर्चेच आली आहे. तिच्या संदर्भात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पूजा खेडकरला २०२० मध्ये मानसिक आजारी असल्याचं सर्टिफिकेट अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने दिलं होतं.

पूजा खेडकराला २०१८ मध्ये नेत्र दिव्यांग सर्टिफिकेट देण्यात आलं होतं, त्यानंतर २०२० मध्ये तिला मानसिक आजारी असल्याचं सर्टिफिकेट देण्यात आलं होतं. शासकीय कायदपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२०२१ मध्ये नेत्र दिव्यांग आणि मानसिक आजारी असे दोन्ही एकत्र करून तत्कालीन मंडळाने पूजा खेडकर यांना बहुविकलांगता सर्टिफिकेट दिल्याचं शासकीय कागदपत्रांमध्ये आढळून आल्याचं नगरच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. त्यामुळे याप्रकरणात आता तत्कालीन डॉक्टरांची नावे देखील समोर येण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकरची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे, महाराष्ट्र शासनाचा लोगो वापरणे अशाप्रकारचे अनधिकृत काम पूजा खेडकर कडून झालं आहे. याशिवाय वरिष्ठांचे दालन ताब्यात घेणे, शिपाई, निवासी संकूल अशा अनेक मागण्या परवानगी नसताना तिने केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट सादर केला होता. त्यानंतर तिची बदली करण्यात आली आहे.

पूजा खेडकर अडचणीत आलीये असं आपल्याला म्हणता येईल. खेडकर प्ररकरणाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. एक सदस्यीय समिती नेमून चौकशी केली जात आहे. खेडकरने नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेटचा लाभ घेतल्याचा देखील आरोप आहे. प्रत्यक्षात ती आणि वडील कोट्यधीश आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप देसाई हे निवृत्त अधिकारी आहेत. राजकारणात देखील ते सक्रिय आहेत. त्यांनी आपले वजन वापरून मुलीला मदत केल्याचा आरोप आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT