Chhagan Bhujbal  
महाराष्ट्र बातम्या

अजित पवार तुमचे नेते तर, आम्ही पण तुमचे कार्यकर्ते, आमच्या पण...; भुजबळांचे पवारांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. सत्ताधाऱ्यांना वाटतं की, शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य करणार आहेत. तर विरोधकांना अजित पवार परतणार, अशी आशा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांच्या वक्तव्याचे आम्ही स्वागत करत आहोत. भुजबळ, मुंडे आणि इतर नेते देखील तुमचे कार्यकर्ते आहेत. अजित पवार तुमचे नेते आहेत तर आम्ही देखील तुमचे कार्यकर्ते आहोत. शरद पवार आमचेचं आहेत. आम्ही देखील त्यांना भेटलो जाऊन. त्यामुळे पक्षात फूट पडली नाही, असं ते म्हणत असतील तर त्यांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे, असं आवाहन भुजबळ यांनी केलं.

खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर शरद पवार यांनी देखील अजित पवार हे आमचेच नेते असल्याचं म्हटलं होते. तसेच सुप्रिया सुळे यांनी पक्षात फूट पडली नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अजित पवार परत येतात की, शरद पवार भाजपसोबत जातात याबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत.

नाफेडच्या कांदा खरेदीवर भुजबळ म्हणाले की, नाफेड अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. आज संध्याकाळपर्यंत नाफेडचे 32 केंद्र नाशिकमध्ये सुरू होणार आहेत. आज लिलाव सुरू झाले आहेत. 2100 ते 2200 रुपये आज भाव मिळत आहे. 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा आहे तर नाफेडकडून केंद्र वाढवावे लागतील, असे मी सांगितल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Visits Pune: डोनाल्ड ट्रम्प सुद्धा आहेत पुणेकर! जेव्हा फ्लॅट बघण्यासाठी आले अन् उभं केलं ट्रम्प टॉवर

Latest Marathi News Updates live : 'संविधान हे फक्त एक पुस्तक नाही' - राहूल गांधी

Donald Trump निवडून आले अन् नेटकऱ्यांनी विजयाचे क्रेडिट Elon Musk यांना दिले, सोशल मीडिया सुसाट.. भन्नाट मिम्स व्हायरल

ICC Test Rankings: मुंबईत बेक्कार हरले अन् कसोटी क्रमवारीत घसरले; विराट, रोहित तर टॉप २० मधून बाहेर फेकले गेले, Rishabh Pant...

PM Modi in Nashik : पंतप्रधानांच्या सभेसाठी शहर पोलिस सतर्क; आयुक्तालयातील बैठकीत कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन

SCROLL FOR NEXT