महाराष्ट्र बातम्या

वीजबिल भरा, अन्यथा कनेक्शन तोडले जाणार

तात्या लांडगे

थकीत वीजबिल न भरणाऱ्या घरगुती, व्यापारी ग्राहकांवर आजपासून तर 23 जूननंतर कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याची मोहीम 'महावितरण'ने हाती घेतली आहे.

सोलापूर : शेतकरी असो वा घरगुती, औद्योगिक, व्यापारी ग्राहकांकडील वीजबिलाच्या (Electricity bill) थकबाकीतून दरमहा (जूनमध्ये) किमान अडीचशे कोटी रूपयांची प्रत्येक विभागांकडून येणे अपेक्षित आहे, असे निर्देश महावितरणकडून (MSEDCL) अधिक्षक अभियंत्यांना दिल्याचे विश्‍वसनिय सूत्रांनी सांगितले. (आज) सोमवारपासून (ता.14) घरगुती, व्यापारी व औद्योगिक ग्राहकांचे कनेक्‍शन तोडणी तर 23 जूनपासून थकबाकीदार शेतकऱ्यांचे कनेक्‍शन तोडण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. (If electricity bills are not paid in Maharashtra from today, connections will be cut off)

राज्यातील सुमारे 90 लाखांहून अधिक ग्राहकांकडे महावितरणची तब्बल 60 हजार कोटींची थकबाकी आहे. वारंवार सूचना करूनही, बिल पोहच करूनही आणि सवलत देऊनही संबंधित ग्राहक वीजबिल भरत नाहीत. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून बिल भरा अन्यथा कनेक्‍शन कपात करा, असे निर्देश वरिष्ठांनी राज्यातील महावितरणच्या 16 विभागांना देण्यात आले आहेत. थकीत बील न भरणाऱ्यांचे कनेक्‍शन कपात केले जाणार आहे. तरीही, चोरून वीज वापरल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात अंदाजित साडेतीन लाख घरगुती ग्राहकांकडे तर एक लाख औद्योगिक व व्यापारी ग्राहकांकडे दोनशे कोटींची थकबाकी आहे. तसेच साडेतीन लाख शेतकऱ्यांकडे पाच हजार 400 कोटींची थकबाकी असल्याची माहिती अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली. थकबाकीदारांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजना, रस्त्यांवरील दिवाबत्तींचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.

पावसाळा असो वा उन्हाळा, सर्वच हंगामात ग्राहकांना महावितरणकडून नियमित वीज पुरवठा केला जातो. ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणा केल्यास विनाखंड वीज पुरवठा सुरू राहील. वारंवार सांगूनही, मुदत देऊनही वीजबिल न भरणाऱ्यांचे कनेक्‍शन आता (आज) सोमवारपासून (ता. 14) कापले जाणार आहेत.

- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर

ठळक बाबी...

- राज्याला दररोज 16 हजार 443 मेगावॅट वीजेची गरज

- राज्यातील ग्राहकांकडे महावितरणची 62 हजार कोटींची थकबाकी

- घरगुती, औद्योगिक, व्यापारी, शेती, पाणी पुरवठा, रस्त्यांवरील दिवाबत्तीचे वीजबिल थकले

- राज्यभरातील 16 विभागांअंतर्गत येणाऱ्या 44 सर्कल अधिकाऱ्यांना वीजबिल वसुलीचे टार्गेट

- सोलापूर जिल्ह्यात सहा हजार कोटींची थकबाकी; जूनमध्ये 243 कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट

- दरमहा किमान अडीचशे कोटींची वसुली करा अन्यथा, थकबाकीदार ग्राहकांचे कनेक्‍शन कपातीचे निर्देश

(If electricity bills are not paid in Maharashtra from today, connections will be cut off)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT