Mahavikas Aghadi  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mahavikas Aghadi : "मविआने एकजूट दाखवली तर 2024ला राज्यात सत्ता येईल"

मविआ म्हणून लढलो तर कसब्याचा निकाल लागतो, थोड जर इकडं तिकडं झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या कसबा आणि चिंचवड निवडणुकीचे वारे आता थंडावले आहे. कसबा पेठेत महाविकास आघाडीने भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. तर चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरल्यामुळे नाना काटे यांनी कलाटे यांची मते घेतली आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकत्र राहिलो तर राज्यात सत्ता मिळवू असा विश्वास व्यक्त केला आहे.

माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो तर कसब्याचा निकाल लागतो आणि थोड जर इकडं तिकडं झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी दिलेला धडा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी केलं आहे.

कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक असल्याचंही ते म्हणाले आहेत. तर 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केलं तर विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. तसेच लोकसभेला 40 जागा निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

तर चिंचवडमधील पराभवावर बोलताना राऊत म्हणाले की, "चिंचवडमध्ये आमच्याकडून काही बाबतीत चूक झाली. चिंचवडचा विजय हा भाजपचा विजय आहे, हे कोणीच मानणार नाही. चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून जगताप पॅटर्न चालतो आहे. हा विजयही जगताप पॅटर्नचा आहे. जर उमेदवार निवडताना अधिकची काळजी आम्ही घेतली असती किंवा राहुल कलाटेंनी माघार घेतली असती तर महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता असंही राऊत पुढे म्हणाले आहेत.

तर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काल झालेल्या हल्ल्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी मला त्याविषयी माहीत नसल्याचं यावेळी सांगितलं तर सर्व पक्षातील नेत्यांनी घोटाळा केला म्हणत मागे लागणारे भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याचे उघड झाले असून यासंबधी दून जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे यावरतीही संजय राऊत यांनी काय बोलणार म्हणत हसून प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT