निष्काळजीपणाने वाहन चालवणाऱ्या चालकांवर होणार आता कारवाई solapur sakal
महाराष्ट्र बातम्या

‘हा’ वाहतूक नियम मोडला की परवाना निलंबित! वाहन चालकांना आता नियम पाळावेच लागतील; दीड वर्षात 34 हजार वाहनचालकांचे परवाने निलंबित

बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करूनही अनेकजण वाहतूक नियम पाळत नाहीत. या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणावर बेशिस्त वाहनचालकांचे परवाने निलंबित केले जात आहेत. दीड वर्षात राज्यातील तब्बल ३३ हजार ८६६ वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : दरवर्षी राज्यात रस्ते अपघातात १३ ते १५ हजार जणांचा मृत्यू होतो. बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करूनही अनेकजण वाहतूक नियम पाळत नाहीत. या पार्श्वभूमीवर आता मोठ्या प्रमाणावर बेशिस्त वाहनचालकांचे परवाने निलंबित केले जात आहेत. दीड वर्षात राज्यातील तब्बल ३३ हजार ८६६ वाहनचालकांचे परवाने निलंबित केल्याची माहिती परिवहन विभागाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, नगर, बीड, जळगाव, नागपूर, जालना, मुंबई, ठाणे अशा बहुतेक शहरांमध्ये महामार्गांची कनेक्टिव्हीटी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुसरीकडे वाहनांचा वेग देखील त्यामुळे वाढला आहे, पण अपघाताचे प्रमाण अपेक्षेपेक्षा अधिकच आहे. वयोवृद्ध किंवा १८ वर्षांखालील मुलांच्या हाती वाहनांची चावी हे देखील अपघाताचे मोठे कारण आहे.

याशिवाय सलग १०- १२ तास ड्रायव्हिंग, क्षमतेपेक्षा अधिक माल किंवा प्रवाशांची वाहतूक, लेन कटिंग, मर्यादेपेक्षा अधिक वेग अशी अपघाताची प्रमुख कारणे आहेत. या पार्श्वभूमीवर बेशिस्तांवर दंडात्मक तसेच परवाना निलंबनाची कारवाई केली जात आहे. मागील दोन महिन्यात देखील जवळपास तीन हजार वाहनचालकांचे परवाने निलंबनाचे प्रस्ताव विविध आरटीओ कार्यालयांकडे दाखल झाले आहेत. याशिवाय महामार्गांवरील खड्डे हे देखील अपघाताचे कारण असून त्याची वेळोवेळी दुरूस्ती जरूरी आहे.

‘हा’ नियम मोडल्यास परवाना निलंबित

वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तर होतेच, याशिवाय आता त्यांचा परवाना कायमचा रद्द किंवा काही महिन्यांसाठी निलंबित देखील केला जातो. त्यात सिग्नल तोडणे, ओव्हरस्पीड, ओव्हरलोड, मद्यपान, ट्रिपलसिट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, अशा कारणांसाठी परवाना निलंबित केला जातो.

अपघात व अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना

रस्ते अपघात कमी करून अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. इंटरसेप्टर वाहनांद्वारे दंडात्मक कारवाई, आयटीएमएस (आपोआप बेशिस्त वाहनांना दंड), ॲटोमेटिक फिटनेस केंद्र, ॲटोमेटिक ट्रॅकवर वाहतूक चाचणी, अशा उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग, समृद्धी महामार्ग, पुणे महामार्ग अशा विविध महामार्गांवरील अपघात व मृत्यू कमी झाले आहेत.

- विवेक भिमनवार, आयुक्त, परिवहन

दीड वर्षातील परवाने निलंबित

  • २०२३ मध्ये परवाने निलंबित

  • २१,२२२

  • जून २०२४पर्यंत परवाने निलंबित

  • १२,६४४

  • एकूण परवाने निलंबित

  • ३३,८६६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT