Vidhansabha Election 2024 esakal
महाराष्ट्र बातम्या

इलेक्शन ड्यूटी नाकारल्यास जावू शकते नोकरी! लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०नुसार कारवाई; शासकीय कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटीसाठी पत्रे; शनिवार-रविवारी पहिले प्रशिक्षण

निवडणूक कामास नकार दिला किंवा कामावेळी कोणी गैरहजर राहिल्यास त्या कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०मधील कलम ३२ व १३४ नुसार थेट फौजदारी गुन्हा दाखल होतो. त्या कर्मचाऱ्याची चौकशी लागते आणि त्यामुळे ना पगारवाढ ना पदोन्नती मिळते. वेळप्रसंगी त्या कर्मचाऱ्याला कायमचे घरी देखील बसायला लागू शकते.

तात्या लांडगे

सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील १९ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी आली आहे. त्या सर्वांना त्यासंबंधीची पत्रे पाठविली आहेत. या कर्मचाऱ्यांचे शनिवारी, रविवारी पहिले प्रशिक्षण पार पडणार आहे. निवडणूक कामास नकार दिला किंवा कामावेळी कोणी गैरहजर राहिल्यास त्या कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५०मधील कलम ३२ व १३४ नुसार थेट फौजदारी गुन्हा दाखल होतो. त्या कर्मचाऱ्याची चौकशी लागते आणि त्यामुळे ना पगारवाढ ना पदोन्नती मिळते. वेळप्रसंगी त्या कर्मचाऱ्याला कायमचे घरी देखील बसायला लागू शकते.

सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी तीन हजार ७२३ मतदान केंद्रे असून एका केंद्रावर किमान १५०० मतदान होईल, असे नियोजन आहे. एका मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रियेसाठी प्रत्येकी चार कर्मचारी असणार आहेत. निवडणुकीसाठी शिक्षण, महसूल, ग्रामविकास, कृषी अशा बहुतेक शासकीय विभागांमधील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी देण्यात आली आहे.

शनिवारी (ता. २६) व रविवारी या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यावेळी सुद्धा या सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी उपस्थित राहावेच लागणार आहे. ‘बीएलओं’ना देखील या काळात इलेक्शन ड्यूटी करणे बंधनकारक आहे. मतदानापूर्वी देखील आणखी एकदा प्रशिक्षण होणार आहे. अनेकांनी इलेक्शन ड्यूटी रद्दसाठी प्रयत्न करीत आहेत, पण कारणांची शहानिशा केल्याशिवाय कोणाचीही ड्यूटी रद्द होणार नाही हे निश्चित आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज बंधनकारक

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १९ हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटीची पत्रे पाठविण्यात आली आहेत. त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज बंधनकारक आहे. येत्या शनिवारी व रविवारी त्यांचे तालुकानिहाय पहिले प्रशिक्षण पार पडणार आहे.

- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर

प्रत्येक मतदान केंद्रास इंडिलेबल शाईच्या दोन बॉटल

म्हैसूर येथे इंडिलेबल शाई तयार करण्याचा शासकीय कारखाना आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी तेथूनच शाई मागविण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी दोन शाईच्या बाटल्या लागतात. उजव्या हाताच्या बोटाच्या नखाला लावलेली शाई किमान दोन महिने तरी पुसली जात नाही, हे तिचे वैशिष्ट्य आहे. लावल्यानंतर काही सेकंदात ती शाई नखावर बसते, पुसण्याचा प्रयत्न केला तरी पूर्णपणे ती जात नाही. त्यामुळे दुबार तथा बोगस मतदानाला चाप बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT