मुंबईः मागच्याच आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अवकाळाची तडाखा बसला होता. गारपीटीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं. आता पुन्हा हवामान विभागाने अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा दिला आहे.
राज्याच्या अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. त्यानुसार १४ एप्रिल रोजी पुणे, नगर, बीड, उस्मानाबाद, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
हेही वाचाः Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तर जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलाय. कोकण विभागातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे. आज १४ एप्रिल रोजी हा अलर्ट देण्यात आलेला असून १५, १६ एप्रिल रोजीही काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आलाय.
मागच्या आठवड्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांना वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा बसला. शेतावर अक्षशः बर्फाने आवरण अच्छादलं होतं.
मराठवाड्यासह नगर, बुलाडाणा, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. त्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट आणि गारपीटीचा इशारा देण्यात आलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.