weather Update Sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: प्रतीक्षा वाढली! राज्यात पावसाची पुन्हा हुलकावणी; सप्टेंबरमध्ये पावसाची आशा

अंकिता खाणे (Ankita Khane)

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परंतु राज्यात पुन्हा पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. अंदाजाप्रमाणे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

राज्यामध्ये शनिवारी काही ठिकाणी पाऊस पडला. मुंबईमध्येही पावसाने गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले होते. तर पुन्हा मान्सूनला पुन्हा सक्रिय होईल अशी अपेक्षा होती. मात्र राज्याच्या काही भागांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातही कोकण आणि विदर्भाच्या काही भागात पाऊस पडेल. मात्र, राज्यभरात पाऊस पडण्याची अपेक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.

ऑगस्टमध्ये सरासरीहून कमी पाऊस असल्यामुळे सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण कोकणात आणि विदर्भात पावसाचा जोर वाढू शकतो. मात्र, याची व्याप्ती वाढण्यासाठी सप्टेंबरची वाट पाहायला लागेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तर राज्याच्या अनेक भागात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. शेतीकामे पुर्ण झाली असली तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT