Supriya Sule 
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule: खासदार सुनील तटकरेंचे तात्काळ निलंबन करा; सुप्रिया सुळेंनी का केली मागणी?

Sandip Kapde

Supriya Sule: एकीकडे राज्यात आमदार अपात्र प्रकारांचा विषय विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुरू असताना खासदार अपात्रतेप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांचे पत्र चर्चेत आले आहे. सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे.

अजित पवार यांच्या गटासोबत गेलेले खासदार सुनील तटकरे यांना अपात्र करण्यासाठी ४ जुलैला याचिका दाखल केली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. लवकरात लवकर यावर निर्णय घेण्याची सुप्रिया सुळे यांनी विनंती केली आहे.

घटना आणि लोकशाही तत्वे टिकवून ठेवण्यासाठी वेळीच यावर निकाल दिला पाहिजे, असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

यापूर्वी फैजल खान यांना कोणतीही केस नसताना आम्हाला कोर्टाची लढाई लढावी लागली. त्यामुळे परिशिष्ट १० नुसार पक्षविरोधई कृती केल्याने सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई करा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

आम्ही पक्षासाठी न्याय मागत आहोत. महिला विधेयकाच्या वेळेस हे खासदार उपस्थित नव्हते. त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने घेतले पाहीजे. लोकसभा सोडून जर लोकप्रतिनीधी नसतील तर ही चिंतेची बाब आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

कारवाई न होण्याच काय कारण?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिल्लीत अदृश्य शक्ती आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील याचा उल्लेख केला आहे. हे सर्व दुसऱ्याच्या जीवावर चाललं आहे. फक्त राष्ट्रीय पक्ष नाहीत तर महाराष्ट्राचं खच्चीकरण  करण्यात येत आहे. रोजगारात देखील राज्याचे खच्चीकरण करण्यात येत आहे.  

सुप्रिया सुळे म्हणाल्या, खासदारांचे प्रकरण देखील न्यायालयात देण्याची वेळ आल्याची शक्यता आहे. न्यायालय देखील अध्यक्षांवर नाराज आहे. देश संविधानावर चालतो अदृश्य शक्तीवर चालत नाही आमच राजकारण संविधानाने चालत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT