NCP MLA disqualification case esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP MLA disqualification: आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी; शरद पवारांची 'ही' मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार?

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या पिठासमोर ही सुनावणी होईल. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणावर सुनावणी झालेली नसल्याने आजच्या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे

मागच्या आठवड्यात शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रकरण मेंशन करतेवेळी विधानसभा निवडणुका लक्षात घेता महत्त्वाची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या सुनावणीकडे विशेष लक्ष असेल. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा परिणाम त्यावर होऊ शकतो. या अर्थाने सुप्रीम कोर्टाचे निर्देश महत्त्वाचे असतील.

शरद पवार यांच्या पक्षाने कोर्टाकडे केलेल्या मागण्या :

-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्या

-अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्याची मागणी करायला सांगा

-निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना (अजित पवार) यांना नवीन चिन्ह घेण्यास सांगावं

लोकसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाने "हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे" अशा आशयाच्या जाहिराती वृत्तपत्रात देण्याचे निर्देश अजित पवार यांना दिले होते.त्यामुळं आज कोर्ट काही वेगळे निर्देश देत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला नवीन चिन्ह घेण्याचे निर्देश दिल्यास शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला तो मोठा दिलासा असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Baner Road Traffic Jam: पुण्यातील बाणेर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी! कामावरुन घराकडं निघालेले पुणेकर वैतागले

Pune Rain : नरेंद्र मोदींच्या सभेच्या ठिकाणी झाले चिखलाचे साम्राज्य

IPL Auction 2025: CSK च्या ताफ्यात अश्विन आण्णाची होणार घरवापसी, तर 'लाला'चीही लागणार वर्णी?

Politics: परळीत पंकजा मुंडेंना मोठा धक्का! विश्वासू शिलेदार शरद पवारांच्या ताफ्यात, विधानसभेचं गणित बदलणार?

BJP News: भाजप नेता हवालदिल! पैसे, दागिने घेऊन बायको प्रियकरासोबत फरार

SCROLL FOR NEXT