HSC Result 2023 esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी! बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून होणार सुरू HSC Result 2023

सकाळ वृत्तसेवा

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट २०२३मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (ता.२९) सुरू होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज घेण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर अर्ज भरायचा आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याचा तपशील

- नियमित शुल्क भरून अर्ज करणे : २९ मे ते ९ जून

- विलंब शुल्क भरून अर्ज करणे : १० जून ते १४ जून

- उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरणे : १ ते १५ जून

- उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करणे : १६ जून

विद्यार्थी-पालकांसाठी सूचना

- फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण विद्याथ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइनद्वारे घेता येणार.

- श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२३ आणि फेब्रुवारी-मार्च २०२४ या दोनच संधी उपलब्ध.

- पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT