beti bachao beti padhao sakal
महाराष्ट्र बातम्या

‘खुडू नको कळी आई, जगू दे गं मला’! राज्यातील ‘या’ १२ जिल्ह्यांत घटले मुलींचे प्रमाण

दरवर्षी राज्यभरातील पोलिस ठाण्यांमध्ये विवाहितेच्या छळाच्या तब्बल ३५ हजारांहून अधिक तक्रारी दाखल होतात. राज्यात मुलींचा घटलेला जन्मदर भविष्याची चिंता वाढविणारा आहे. राज्यातील १२ जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९०० पेक्षा कमी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानातून सरकारने जनजागृतीचा प्रयत्न केला. तरीदेखील समाजाची मानसिकता पूर्णत: बदलीच नाही. मुलगी ही डोक्यावरील ओझे समजून तिचा बालवयातच विवाह लावला जातो. त्यांना वडिलांच्या संपत्तीत सर्रासपणे हिस्सा मिळतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. मुलगा पाहिजे म्हणून गरोदर मातेचा प्रसुतीपूर्व अवैधरित्या गर्भपात केला जातो. दुसरीकडे पाठोपाठ मुलीच झाल्या म्हणून विवाहितेचा छळही सुरु आहे. दरवर्षी राज्यभरातील पोलिस ठाण्यांमध्ये विवाहितेच्या छळाच्या तब्बल ३५ हजारांहून अधिक तक्रारी दाखल होतात. राज्यात मुलींचा घटलेला जन्मदर भविष्याची चिंता वाढविणारा आहे. राज्यातील १२ जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९०० पेक्षा कमी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मुलींचे प्रमाण कमी होण्याची कारणे…

  • वंशाला वारसदार हवा म्हणून बहुतेकांची मुलांनाच पसंती

  • सर्वसामान्य कुटुंबियांना शिक्षण व विवाहाचा खर्च पेलवत नाही

  • सगळीकडे मुली-महिलांवरील अत्याचारात झाली वाढ

  • मुलगा शेवटपर्यंत आई-वडिलांजवळ राहू शकतो; मुलगी परक्याचे धन ही मानसिकता

‘पहिली ते उच्च शिक्षण’ मोफत काळाची गरज

पुरोगामी महाराष्ट्रात दरवर्षी कायद्याचा व त्यातील नियमांचा आधार घेऊन तब्बल दोन लाखांपर्यंत गर्भपात होतात. त्यासाठी अनेक कारणे आहेत. दुसरीकडे अवैधरित्या गर्भपाताचे प्रकारही उघड झाले आहेत. त्यात पैसे कमविण्याच्या लालसेतून काही डॉक्टरांनीही मदत केल्याचे समोर आले. त्यामुळे स्वत:च्या पालकांना ‘खुडू नको कळी आई, जगू दे गं मला’ अशी म्हणण्याची वेळ ‘ती’च्यावर आली आहे. राज्यातील बालविवाहांचे प्रमाण देखील लक्षणीय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रामबाण इलाज म्हणून सरकारने ‘पहिली ते उच्च शिक्षण’ (सर्व विद्याशाखा) मोफत करण्याची काळाची गरज बनली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून मुलींच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिक्षणातून मोठ्या पदापर्यंत पोहचलेल्या मुली-महिलांच्या प्रेरणेतून पालकांची मानसिकता बदलेल, असा विश्वास अनेकांना आहे.

मुलींचे प्रमाण सर्वात कमी (२०२१-२२)

जिल्हा मुलींचे प्रमाण

  • बुलढाणा ८६२

  • कोल्हापूर ८६८

  • वाशिम ८७२

  • धुळे ८७३

  • नगर ८८६

  • औरंगाबाद ८८०

  • सातारा ८८५

  • जालना ८८६

  • नाशिक ८९०

  • सोलापूर ८९२

  • जळगाव ८९५

  • बीड ८९८

पाच वर्षांतील मुलींचे प्रमाण

  • सन मुलींची सरासरी

  • २०१७ ९१३

  • २०१८ ९१६

  • २०१९ ९१९

  • २०२० ९१३

  • २०२१ ९०६

संत तुकाराम महाराज म्हणतात, जगात आईच सर्वश्रेष्ठ

मुलगी वंशवाढीचे मूळ आहे. मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुलगी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू लागली आहे. महिलेला अध्यात्मात खूप मोठे महत्त्वाचे स्थान असून दरवर्षी देशभर नवरात्रोत्सव, कन्या दिन साजरा केला जातो. तरीपण, मुलगा-मुलगी भेद सुरुच आहे. पण, प्रत्येकाच्या जीवनातील ईचे महत्व सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात, लेकुराचे हित| पाहे माऊलीचे चित्त|| ऐसी कळवळ्याची जाती| करी लाभाविण प्रिती|| पोटी भार वाहे| त्याचे सर्वस्वही साहे||. आई ही आपल्या लेकरांचे हित नेहमीच पाहात असते. कोणत्याही लाभाशिवाय ती मुलांच्या भविष्यासाठी उपाशीपोटी काबाडकष्ट करत असते. त्यामुळे जगात आईच सर्वश्रेष्ठ असून तिला नेहमी जपावे, असेही त्यांनी अभंगातून स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT