mahavikas aaghadi sakal
महाराष्ट्र बातम्या

तिघांच्या भांडणात भाजपचाच फायदा! वरिष्ठ नेत्यांची वज्रमूठ, पण स्थानिक पातळीवर गटतट

तिन्ही पक्षातील नेत्यांनी ‘व्रजमूठी’तून सभा घ्यायला सुरवात केली आहे. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवरील बंडखोरी, गटतट संपविण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. नाहीतर ‘तिघांची भांडणे अन्‌ विरोधकांचाच लाभ’ अशी स्थिती होऊ शकते.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर ५७ वर्षे एकमेकांच्या विरोधात लढलेल्या शिवसैनिकांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घ्यावे लागले होते. नेत्यांनी वरिष्ठ स्तरावरून आदेश जरी दिला, तरीदेखील स्थानिक पातळीवर वस्तुस्थिती वेगळीच असते. कोरोनाचा धोका कमी झाला आणि अडीच वर्षांतच महाविकास आघाडी सरकार कोसळले.

आता पुन्हा तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांच्या हातात ‘हात’ घेऊन ‘व्रजमूठी’च्या माध्यमातून सभा घ्यायला सुरवात केली आहे. मात्र, भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवरील बंडखोरी, गटतट संपविण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर असणार आहे. नाहीतर ‘तिघांची भांडणे अन्‌ विरोधकांचाच लाभ’ अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

देशाच्या राजकारणात काँग्रेसच्या प्रभावी व्यक्तींमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव नेहमीच आघाडीवर असायचे. पण, २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही वरिष्ठ नेत्यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून बाजूला केले, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्याऐवजी दुसऱ्याच नेत्यांची नावे पाठवली, तरीदेखील ‘राजस्थान’च्या मदतीने ते जिल्हाध्यक्ष बनले.

आता त्यांनी सभासद नोंदणी सर्वाधिक केल्याचे सांगत तालुकाध्यक्ष नेमले. त्यावर शिंदे यांनी आक्षेप घेतला, पण त्याच पदाधिकाऱ्यांना कायम ठेवले गेले. काँग्रेसचे सुदीप चाकोते यांनी थेट वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून मोठे पद घेतल्याचीही चर्चा आहे. ग्रामीणमधील बहुतेक लोक कामानिमित्त जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक कार्यालयात दररोज ये-जा करतात. पण, गटबाजीमुळे धवलसिंह मोहिते-पाटील सोलापूर काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात न येणेच पसंत करतात, असेही बोलले जाते. दुसरीकडे पदावरून पायउतार झालेल्या नेत्यांना संपर्कात ठेवले जात नाही. त्यामुळे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले असे अनेक नेते सध्या पक्षाच्या कार्यक्रमात जास्त करून दिसतच नाहीत.

राष्ट्रवादी-शिवसेनेतही धुसफूस

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी महापालिकेची जबाबदारी महेश कोठे यांच्यावर सोपवली आहे. पण, काँग्रेस, शिवसेना असा प्रवास करून राष्ट्रवादीत आलेल्या कोठेंसोबत अजूनही सर्वच पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन झाली नसल्याची स्थिती आहे. त्यांनी स्वत:च्या ताकदीवर पक्षात वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न सुरु केल्याने आमचे महत्त्व कमी झाल्याचे काहींचे म्हणणे असल्याची चर्चा आहे.

काहींनी प्रभागनिहाय उमेदवार देखील निश्चित केले आहेत, पण कोठेंना ते मान्य नाहीत. त्यामुळे आगामी काळात त्यावरून अंतर्गत संघर्ष निर्माण होऊ शकतो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी कोठेच दिसत नाहीत. बरेच पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत जावे की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहायचे, अशा द्विधा मनःस्थितीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने निवडणुकांपूर्वी जुन्या-नव्यांचा मेळ बसवून ‘वज्रमूठ’ पक्की केली, तरच यश मिळेल.

अन्यथा, काहीही न करता भाजपला फायदा होईल, असे राजकीय जाणकार सांगतात. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतून ते दिसून आले आहे. आपल्याच पक्षातील बंडखोर उमेदवारामुळे भाजपचा उमेदवार त्याठिकाणी विजय झाला.

माजी खासदार सादुल यांची बोलकी खंत

काँग्रेसकडून दोनवेळा खासदार राहिलेले धर्मण्णा सादुल आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर यांच्या भारत राष्ट्र समितीत (बीआरएस) दाखल होत आहेत. १९८९ ते १९९६ या काळात ते दोनदा सोलापूरचे खासदार राहिले आहेत. त्यांनी भाजपचे लिंगराज वल्याळ व गोपीकिसन भुतडा यांचा पराभव केला होता. दोन्हीवेळी ते सव्वालाख मताधिक्य घेऊन विजयी ठरले होते. मागील काही वर्षांपासून पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना बोलावले जात नव्हते. पक्षातील पदाधिकाऱ्यांसह नेतेमंडळी देखील विचारपूस करीत नव्हते. त्यामुळे आपण तेलुगू भाषिकांसह सोलापूरकरांच्या विकासासाठी पक्षांतराचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे पक्षांतराची चर्चा असतानाही कोणीच त्यांची भेट घेतली नाही, ना कारण विचारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT