Waghnakh  
महाराष्ट्र बातम्या

नोव्हेंबर महिन्यात योग्य तिथीवरच वाघनख परत आणणार; मंत्री मुनगंटीवार यांची माहिती

रवींद्र देशमुख

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखं भारतात परत आणले जाणार आहेत. ही वाघनखं सध्या ब्रिटनच्या संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. हा भारताचा अनमोल ठेवा परत आणण्याची मागणी मागील बऱ्याच दिवसांपासून होत आहे. याबाबत सरकारमधील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

मुनगंटीवार म्हणाले की, तारखेनुसार ज्या दिवशी अफजल खानाचा वध करण्यात आला होता, तिथलं ०.२२ हेक्टर अतिक्रमण आपण हटवलं आहे. आता दुसरा टप्पा वाघनखं लंडनमधून आणण्याचा आहे. त्यानुसार मी १ ऑक्टोबर रोजी जाणार आहे. नोव्हेंबरमध्ये योग्य तिथीला वाघनखं परत आणणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान नोव्हेंबरमध्ये मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे वघानख महाराष्ट्रात आणचे आहेत. त्यांनी सांगितलं की, वाघनख तुम्हाला गावोगावी फिरवता येणार नाहीत. हे वाघनख छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवणार असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi-Trump: विजयानंतर ट्रम्प यांना पहिला फोन मोदींचा; म्हणाले, माझ्या मित्रासोबत...

Elon Musk on Trump Victory: ट्रम्प यांच्या विजयावर इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया; म्हणाले, अपरिहार्य...

Manoj Jarange Patil : ...अन्यथा थेट कार्यक्रम करेन; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचा नेता अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष झाला; आठवलेंनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, भारत...

Mephedrone Case : मेफेड्रोन उत्पादन प्रकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT