suicide  sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्याची ऐतिहासिक मनुष्यहानी! दोन वर्षांत पावणेदोन लाख मृत्यू

अनेक दुर्घटनांमध्येही मोठी मनुष्यहानी झाली आहे.

तात्या लांडगे

अनेक दुर्घटनांमध्येही मोठी मनुष्यहानी झाली आहे.

सोलापूर : देशाच्या, राज्याच्या प्रगतीत तेथील मनुष्यबळ खूप महत्त्वाचे ठरते. मात्र, दोन वर्षांत राज्याची ऐतिहासिक मनुष्यहानी झाली आहे. कोरोनासह (Corona) रस्ते अपघात (Road accident), शेतकरी (Farmers) व इतर व्यक्‍तींनी आत्महत्या (Suicide) केल्या असून अनेक दुर्घटनांमध्येही बळी गेले आहेत. धक्‍कादायक बाब म्हणजे जानेवारी 2020 ते डिसेंबर 2021 या दोन वर्षांत तब्बल पावणेदोन लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला आणि पाहता पाहता कोरोनाच्या बळींची संख्या एक लाख 41 हजार आठेशपर्यंत गेली. दुसरीकडे महामार्गांची कनेक्‍टिव्हीटी वाढल्याने वाहनांचा वेगही वाढला आणि मागील दोन वर्षांत 22 हजार रस्ते अपघात झाले. त्यात 2020 मध्ये 11 हजार 569 तर 2021 मध्ये बारा हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला. चिंतेची बाब म्हणजे 12 हजार 282 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. पुणे (Pune), नाशिक(Nashik), नागपूर (Nagpur), नगर (Nagar), औरंगाबाद (Aurangabad) व सोलापूर (Solapur) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू झाले. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याही थांबलेल्या नाहीत. दोन वर्षांत पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नापिकी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणासह विविध कारणास्तव आपली जीवनयात्रा संपविल्याचे मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीवरून समोर आले. औरंगाबाद, नागपूर, नाशिक विभागांमध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढी मोठी मनुष्यहानी कधीच झाली नव्हती. भविष्यात अशी मनुष्यहानी होणार नाही, यादृष्टीने आता राज्य सरकार काय ठोस उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऐतिहासिक मनुष्यहानीची स्थिती (2020 ते 2021)

- कोरोनाचे बळी- 1,41,779

- रस्ते अपघातात मृत्यू- 24,028

- शेतकरी आत्महत्या- 5,109

- एकूण- 1,70,893

सहा जिल्ह्यांचा प्रवास जिवघेणा

महामार्गांच्या कनेक्‍टिव्हिटीनंतर रस्ते चौपदरी व सहापदरी झाले, अपघातप्रवण ठिकाणेही (ब्लॅकस्पॉट) कमी झाली. तरीही, अपघात व मृतांची संख्या कमी झाली नाही, हे विशेष. 2018 ते 2021 या चार वर्षांत राज्यात तब्बल 45 हजार 763 अपघातांमध्ये 51 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे 33 हजार जण गंभीर जखमी झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या माहितीवरुन स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्हा अपघाती मृत्यूमध्ये अव्वल असून 2021 मध्ये जिल्ह्यातील एक हजार 212 जणांचा तर नाशिक जिल्ह्यातील 947, नागपूर जिल्ह्यात 667, नगर जिल्ह्यात 639, सोलापूर जिल्ह्यात 543 आणि औरंगाबाद जिल्ह्यात 504 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT