Inflation Allowance sakal
महाराष्ट्र बातम्या

Inflation Allowance : राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या थकबाकीसह महागाईभत्त्यात ४ टक्के वाढ याच महिन्याच्या म्हणजेच जुलैच्या वेतनापासून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या थकबाकीसह महागाईभत्त्यात ४ टक्के वाढ याच महिन्याच्या म्हणजेच जुलैच्या वेतनापासून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने या मागणीसह राज्य शासनातील सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठपुरावा केला होता. याच विषयांवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १० जून २०२४ रोजी बैठक झाली होती.

त्यानंतर याच विषयावर २८ जून २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अधिकारी महासंघाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकांत केंद्र सरकारप्रमाणे १ जानेवारी २०२४पासून ४ टक्के महागाईभत्ता वाढ थकबाकीसह मंजूर करण्याची आग्रही मागणी अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले होते.

त्याला अनुसरूनच राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात १ जानेवारी २०२४पासून ४ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने या मागणीसह राज्य शासनातील सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठपुरावा केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT