India Alliance 
महाराष्ट्र बातम्या

India Alliance: वंचित'बाबत इंडिया आघाडीची भूमिका काय? आजच्या बैठकीत झाला मोठा निर्णय

आज (मंगळवार) दिल्लीत अशोका हॉटेलमध्ये बैठक झाली. यामध्ये 28 पक्षांचे प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचा समावेश होता. बैठकीच्या माध्यमातून विरोधी पक्षांची पुन्हा एकजूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Sandip Kapde

India Alliance: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर 15 दिवसांनी दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक पार पडली. यापूर्वी पाटणा, बेंगळुरू आणि मुंबई येथे युतीच्या बैठका झाल्या. बैठकीच्या एक दिवस आधी आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, जेडीयू नेते नितीश कुमार, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी दिल्लीत आले होते. आज (मंगळवार) दिल्लीत अशोका हॉटेलमध्ये बैठक झाली. यामध्ये 28 पक्षांचे प्रमुख आणि त्यांच्या नेत्यांचा समावेश होता. बैठकीच्या माध्यमातून विरोधी पक्षांची पुन्हा एकजूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील या बैठकीत हजर होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सोबत घेण्याबाबत अनेक नेत्यांचं मत अनुकूल होतं. वंचित बहुजन आघाडीकडे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाने प्रस्ताव मागवला आहे.

वंचितचा प्रस्ताव आल्यानंतर त्यांना आघाडीत घेण्याबाबत पुन्हा चर्चा होणार आहे. यांच महिन्यात वंचित आघाडी आपला प्रस्ताव देणार आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी त्यांना सोबत घेण्याची भूमिका इंडिया आघाडीने घेतली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान आजच्या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाला नाही. जागावाटप त्या-त्या राज्यातील नेत्यांनी बसून ठरवावं, अस बैठकीत ठरल्याची चर्चा आहे. तसेच महाराष्ट्रातील जागावाटपसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांची पुन्हा दिल्लीत काँग्रेस हायकमांड सोबत बैठक होणार आहे. राज्यातील जागावाटप या महिना अखेर पर्यंत होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

जागावाटपावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, जागावाटप राज्य पातळीवर होईल. हा फॉर्म्युला चालला नाही, तर आम्ही सर्व मिळून याबाबत निर्णय घेऊ. दिल्ली आणि पंजाबचा प्रश्न कसा सोडवायचा याचा नंतर विचार केला जाईल. दिल्ली, पंजाब यासारखी जटिल राज्ये नंतरच्या टप्प्यात घेतली जातील. या बैठकीत, टीएमसीने सर्व जागा वाटपाची चर्चा पूर्ण करण्यासाठी भारत आघाडीच्या पक्षांसोबत एकत्र येण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ची अंतिम मुदत निश्चित केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Latest Marathi News Updates live : shivsena live: शरद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर, राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा घेणार

Captain David Warner: बंदी हटली अन् डेव्हिड वॉर्नरकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधून मोठी बातमी

Mumbai Weather Update: येत्या काही दिवसात कसं असेल मुंबईचं तापमान? जाणून घ्या एका क्लिकवर..

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

SCROLL FOR NEXT