Mulshi Satyagraha sakal
महाराष्ट्र बातम्या

सत्याग्रहासाठी बसलेल्या लोकांच्या अंगावर गरम पाणी ओतले होते, वाचा मुळशी लढा

आज 16 एप्रिल 2022 ला आधुनिक भारतातील पहिल्या धरणाविरोधी लढ्याला 101 वर्षे पूर्ण झाली

दिपाली सुसर

माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये महत्त्वाचा फरक समजुतीचा असतो. माणसाने स्वत:भोवती नैतिकतेचे आवरण घेतले. काय करावे, काय करू नये, कसे वागावे, याविषयी अलिखित; परंतु ठळक नियम ठरविले. प्राण्यांमध्ये हे नसते. जंगलाचा कायदा ‘जीवो जीवस्य जीवनम’ असा चालतो. जो दुर्बळ असतो, तो सबळाचा घास होतो आणि पुढे तो सबळही कोणाचा तरी घास होतोच. आपल्यापैकी कोणी असे वागू नये, साऱ्यांना जगण्याला पुरेसा वाव मिळावा, यासाठी माणसाने कायदे केले. चौकटी उभारल्या. या चौकटी, कायदे मोडून जेव्हा कोणीतरी जंगलाच्या कायद्याने वागू लागतो, तेव्हा माणसाच्या जगात जंगलाचा पॅटर्न सुरू होतो. (India’s First Anti-Dam Struggle mulshi satyagraha completed 101 years)

‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट तुम्ही आम्ही पाहिला पण याच मुळशीला एक खऱ्या सत्याग्रहाचा इतिहास आहे तोच आपण जाणून घ्या.

आज 16 एप्रिल 2022 ला आधुनिक भारतातील पहिल्याधरण ग्रस्तांच्या सत्याग्रहाच्या लढ्याला 101 वर्षे पूर्ण होत आहेत. मुळशी सत्याग्रहाची सुरुवात 16 एप्रिल 1921 रोजी रामनवमीच्या दिवशी झाली. सर्व सत्याग्रही धरणाच्या पायाभरणीच्या कामाच्या ठिकाणी गोळा झाले होते. काम थांबावे म्हणून बसून किंवा झोपून राहिले. एवढंच काय तर धरण बांधायचे असेल तर आमच्या शरीरावर बांधा, अशी त्यांची भूमिका होती.

मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी हे धरण बांधणार्‍या आणि लोकांचा संघर्ष चिरडून टाकण्यार्‍या टाटा कंपनीच्या विरोधात हा लढा होता. सत्याग्रही बांधकामाच्या जागेतून बाहेर निघावे यासाठी सत्याग्रहासाठी बसलेल्या लोकांच्या अंगावर गरम पाणीसुध्दा ओतले गेले, असे सांगितले जाते.

मुळशी सत्याग्रह लढ्याचे नेतृत्व पांडुरंग महादेव ऊर्फ सेनापती बापट आणि वि. म. भुस्कुटे यांनी केले. हा शक्तिशाली संघर्ष केवळ धरणाखाली गेलेल्या ५२ गावांमध्येच नव्हे तर बाहेरही, अगदी पुण्यापर्यंत आणि त्यापलीकडे पसरला होता.

ऐकशे एक वर्षांपूर्वीच्या या संघर्ष लढयाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियाही या संघर्षात सहभागी होत्या आणि त्याही तितक्याच ताकदीने आपल्या जमिनी वाचवण्यासाठी लढल्या होत्या. बाई माणुस लढ्यात असणाऱ्या प्रत्येक सत्याग्रही लोकांना मारहाण झाली होती आणि त्यांनी तुरुंगवास देखील भोगला होता. असा उल्लेख महादेवभाई देसाई यांच्या डायऱ्यांमध्ये संदर्भासह मिळतो.

सत्याग्रहींच्या हट्टापाई जानेवारी 1922 पर्यंत धरणाचे काम बंद राहिले. पण,तत्कालीन सरकारने फोडा आणि राज्य करा या धोरणाचा अवलंब करून काही शेतकऱ्यांना अधिक रकमेच्या परताव्याचे अमिश दाखवून अखेर मुळशी धरणाचे काम सुरू करुन धरण बांधुनच दाखविले.

सत्याग्रहामुळे काही प्रमाणात का होईना लोकांना आपल्या जमिनीचे परतावे थोड्या फार प्रमाणात योग्य मिळाले, हे मुळशीच्या सत्याग्रहाचे लढ्याचे फलित होते.

पुढे सात वर्षात धरणाचे काम पूर्ण होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरले गेले.हजारो वर्षांपासून लोक राहत असणारी संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली. सोणं पिकवणारी धरती म्हणजे शेतकऱ्यांची जमिन हातातुन निघुन गेली .जमिनीचा भेटलेला पैसा जितक्या लवकर आला तितक्याच लवकर तो संपला, गावातील जुणे वाडे धाब्याची घरच्या घर पाण्याखाली गेली.

एकुन 52 गावांतील लोकांचे जगणे एका झटक्यात हिरावून घेण्यात आले.धरणग्रस्त झालेले विस्थापित झालेले लोक आजूबाजूच्या डोंगरदऱ्यात विसावले. बहुतेक लोक गावसोडुन पोटासाठी पुणे-मुंबई सारख्या शहरांत गेले अन तिकडेच स्थायिक झाले अन गावे ओसाड पडली

मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या कमी जास्त प्रमाणात आज ४० गावे आहेत.ही गावं धरणामुळे संपूर्ण किंवा काही प्रमाणात बाधित झालेली आहे. बहुतेक गावातील लोक आपल्याच शिवारात टाटा कंपनीच्या मालकीच्या जागेवर शेती करून राहत आहे. यामुळे लोकांचे जगणे टाटा कंपनीवर सर्वस्वी अवलंबून आहे. याचबरोबर रस्ते, वीज आणि पाण्याच्या सोयी सुविधा टाटा कंपनीच्या सहकार्याशिवाय या लोकांस मिळणे अशक्य आहे.

बहुतेक गावांत शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांची खुपच कमतरता आहे. या भागात राहणारे लोक त्यांची घरे आणि शेती हे अतिक्रमण असल्यामुळे त्यांना तिथे कोणतेच नवीन बांधकाम करता येत नाही. मुळशीतील बाधित लोकांना कधीच त्यांच्या हक्काचा जमिनीचा एक तुकडाही आजपर्यंत मिळाला नाही.

पुढे 1947 साली आपला भारत देश स्वातंत्र झाला. कसेल त्याची जमीन असा कायदा आला. पण मुळशीतील लोक कसत होते ती जमीन तर आधीछ धरणात गेली आणि नंतर डोंगरदऱ्यात कसत असलेली जमीन त्यांच्या मालकीची अजूनही झालेली नाही.

एकंदरीत काय सर महानगराच्या विकासाचा आलेख उंचवण्याच्या नादात मुळशी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे मुडदे गाडुन धरण बांधले गेले. आज सत्याग्रहाच्या 101 वर्षे पूर्ण होत असल्याच्या मुळशी सत्याग्रहाच्या या कडु आठवणींना उजाळा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT